ITR for Moonlighting Sakal
Personal Finance

ITR for Moonlighting: मूनलायटिंग करुन पैसे कमावताय? तर ITR मध्ये द्यावी लागेल माहिती, अन्यथा...

जर तुम्ही नोकरीसोबत मूनलायटिंग करून पैसे कमावले असतील तर त्याबद्दलची माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये देणे गरजेचे आहे.

राहुल शेळके

Income Tax Return Filing For Moonlighting Or Earning From Sources Other Than A Regular Job

ITR for Moonlighting: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) मध्ये सर्व स्त्रोतांकडून मिळणा-या उत्पन्नाची माहिती देणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या नोकरीसोबत मूनलायटिंग करून पैसे कमावले असतील तर तुम्ही त्याबद्दलची माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये देणे गरजेचे आहे. जर तुम्ही मूनलायटिंग मधून मिळणारे उत्पन्न लपवले असेल तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो.

नोकरी व्यतिरिक्त, जर तुम्ही इतर कंपनी किंवा संस्थेत कोणत्याही अतिरिक्त उत्पन्नासाठी काम केले असेल तर त्याला मूनलायटिंग म्हणतात.

कर भरावा लागेल

कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी मूनलाइटिंग करत होते. आयकर कायद्यात मूनलाइटिंगबद्दल कोणतीही विशिष्ट तरतूद नाही, पण याचा अर्थ असा नाही की या उत्पन्नावर कर लागणार नाही.

मूनलाइटिंगमधून मिळणारी कमाई पगाराच्या स्वरुपात मिळाली असेल तर त्या बदल्यात मुख्य कंपनीच्या पगारासह 'salary' या शीर्षकाखाली दाखवावे लागते. वजावट आणि सूट दिल्यानंतर झालेल्या उत्पन्नावर कर स्लॅब ज्या दरात येतो त्या दराने कर भरावा लागेल.

जर कमाई फ्रीलान्स वर्क किंवा व्यावसायिक फीच्या स्वरूपात असेल तर ती व्यवसायातील उत्पन्नाच्या अंतर्गत येईल. त्यावर व्यवसायातील उत्पन्नाप्रमाणे कर आकारला जाईल.

कोणता फॉर्म भरायचा

जर मूनलाइटिंगमधून मिळणारा पगार म्हणून मिळत असेल तर ती आयटीआर-1 मध्ये दाखवावी लागेल. एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, कोणताही प्रकारचा भांडवली नफा असेल, तर ITR-2 फॉर्म लागू होईल.

त्याचप्रमाणे, व्यवसाय किंवा व्यावसायिक शुल्कातून अतिरिक्त उत्पन्न असल्यास आणि Presumptive Tax Scheme (PTS) निवडल्यास, ITR-4 दाखल करावे लागेल. व्यावसायिक शुल्क म्हणून मिळालेली एकूण रक्कम 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास, हे उत्पन्न ITR-3 मध्ये दाखवता येईल.

आयकर विभागाकडे माहिती

फॉर्म 26AS मध्ये वार्षिक माहिती आणि तपशीलवार करदात्याच्या माहितीचा सारांश असतो. यामध्ये कोणाला किती पैसे मिळाले आणि त्यावर किती कर कापला गेला हे स्पष्ट होते.

जर असे कोणतेही उत्पन्न लपवले गेले असेल किंवा रिटर्नमध्ये माहिती दिली गेली नसेल तर ते आयटी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या डेटाशी मिस होते.

त्यामुळे, जर तुम्हाला कोणत्याही बाह्य स्रोतातून उत्पन्न मिळत असेल, तर तुम्ही तुमच्या आयकर रिटर्नमध्ये त्याची माहिती देणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT