Indian reacts after U.S. President Donald Trump announces a 25% tariff on key Indian exports, signaling trade tensions.  esakal
Personal Finance

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

India responds to Trump tariff on Indian goods : जाणून घ्या, भारत सरकारने ट्रम्प यांच्या निर्णयावर नेमकी काय भूमिका घेतली आहे आणि काय म्हटले आहे?

Mayur Ratnaparkhe

Trump tariff and India : अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विविध देशांवर टॅरिफ  बॉम्ब फोडणं सुरूच आहे. आज(बुधवार) ट्रम्प यांच्या टार्गेटवर भारत होता, ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लावण्याची  आणि दुय्यम निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. यानंतर काही तासांतच, भारत सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केली. 

भारत सरकारने म्हटले आहे की सरकार अमेरिकेशी व्यापार चर्चा सुरू ठेवत शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलेल. "सरकार आपल्या शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईंच्या कल्याणाचे रक्षण आणि प्रोत्साहन देण्याला सर्वोच्च महत्त्व देते.  सरकार आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल. जसं की ब्रिटनसोबतच्या आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांच्या बाबतीत केले गेले आहे "

ट्रम्प यांनी जाहीर केलेला नवीन टॅरिफ प्लॅन भारताच्या अनेक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या निर्यात क्षेत्रांवर लागू होईल. २५ टक्के टॅरिफ यादीमध्ये ऑटोमोबाईल्स, ऑटो कंपोनंट, स्टील, अॅल्युमिनियम, स्मार्टफोन, सोलर मॉड्यूल्स, सागरी उत्पादने, रत्ने आणि दागिने आणि निवडक प्रक्रिया केलेले अन्न आणि कृषी उत्पादने यांचा समावेश आहे. तथापि, फार्मास्युटिकल्स, सेमीकंडक्टर्स आणि महत्त्वांची खनिजे वगळण्यात आली आहेत.

ट्रम्प यांनी काय म्हटलं होतं? -

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "भारत आपला मित्र असला तरी, अनेक वर्षांपासून आपण त्यांच्यासोबत फार कमी व्यापार करत आहोत, कारण त्यांचे शुल्क (टॅरिफ) खूप जास्त आहेत, जगात सर्वाधिक आहेत. तसेच त्यांच्याकडे इतर कोणत्याही देशांपेक्षा सर्वात कठोर आणि त्रासदायक व्यापारी अडथळे आहेत." त्यांनी भारताचे रशियाशी असलेले संबंधही आपल्या निर्णयाचे कारण म्हणून सांगितले. अमेरिकेने वारंवार भारत-अमेरिका व्यापार तुटीचा मुद्दा उचलला आहे.

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा अमेरिकेशी असलेला व्यापार वाढीव नफा ४१.१८ अब्ज डॉलर होता. त्यामुळे अमेरिकेसाठी हे शुल्क लावणे महत्त्वाचे आहे. गेल्या आर्थिक वर्षात, अमेरिकेला भारताची निर्यात ११.६ टक्क्यांनी वाढून ८६.५ अब्ज डॉलर झाली, तर आयात ७.४ टक्क्यांनी वाढून ४५.३ अब्ज डॉलर झाली. यामुळे ४१ अब्ज डॉलरचा मोठा व्यापार वाढीव नफा झाला. हा वाढता व्यापार वाढीव नफा ट्रम्प यांना कमी करायचा आहे आणि या शुल्कामुळे तो कमी होण्याची शक्यता आहे.

एलारा कॅपिटलच्या अर्थशास्त्रज्ञ आणि कार्यकारी उपाध्यक्ष, गरिमा कपूर म्हणाल्या, "२५ टक्के शुल्क दर हा नक्कीच नकारात्मक बदल आहे, कारण व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स यांसारख्या प्रतिस्पर्धी देशांवर कमी दर आहेत. हे देश भारताशी सेवा-आधारित उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्पर्धा करतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: 'वीरशैव अन्‌ लिंगायत एकच; नवीन धर्माला नाही पाठिंबा'; हुबळीतील संमेलनात चार जगद्‌गुरू..

Suji Chila Vs Besan Chilla Vs Wheat Roti: रवा चिला, बेसण चिला कि चपाती? वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर?

Air Pollution: वायू प्रदूषणाच्या संकटावर मात! पनवेल पालिकेची १० ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा

U19 IND vs U19 AUS: भारताने फक्त ३१ ओव्हरमध्ये पार केलं ऑस्ट्रेलियाचं मोठं लक्ष्य; पहिल्या वनडेत दणदणीत विजय

PM Modi: आधी व्यापाऱ्यांच्या वेदनेचा संघर्ष सांगितला; नंतर नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाला कोणता नवा मंत्र दिला?

SCROLL FOR NEXT