Keshub Mahindra Passes Away Sakal
Personal Finance

Keshub Mahindra Passes Away : भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रा यांचे 99 व्या वर्षी निधन

भारतातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे बुधवारी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले.

राहुल शेळके

Keshub Mahindra Passes Away: भारतातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे बुधवारी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. महिंद्राची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर होती.

त्यांच्या अध्यक्षपदाच्या 48 वर्षांच्या कालावधीत, महिंद्रा समूहाचा विस्तार ऑटोमोबाईल उत्पादक ते आयटी, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा यासारख्या इतर व्यवसाय विभागांमध्ये झाला.

केशब महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष होते, यूएसए, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे ते पदवीधर होते. 1947 मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर 1963 मध्ये ते चेअरमन झाले.

विलीज कॉर्पोरेशन, मित्सुबिशी, इंटरनॅशनल हार्वेस्टर, युनायटेड टेक्नॉलॉजीज, ब्रिटीश टेलिकॉम आणि इतर बर्‍याच मोठ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महिंद्राच्या वेबसाइटनुसार केशब महिंद्रा यांची केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह अनेक समित्यांवर काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. 2004 ते 2010 पर्यंत, ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे, नवी दिल्लीचे सदस्य होते.

त्यांनी सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआयसह विविध कंपन्यांच्या बोर्ड आणि कौन्सिलवरही काम केले आहे.

अलीकडेच, केशब महिंद्रा यांचा समावेश फोर्ब्स मासिकाने 2023च्या यादीत केला होता. फोर्ब्सने सांगितले होते की ते सर्वात वयस्कर भारतीय अब्जाधीश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT