Share Market Sakal
Personal Finance

Equity Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक आवश्यक

शेअर मार्केटमधील विविध सेक्टर्स आणि कंपन्यांचा आकार यासंदर्भात आता अनेकांना माहिती आहे. गुंतवणूक शास्त्राचा विचार करता आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाईड असणे आवश्यक आहे.

प्रशांत पाटील, सकाळ वृत्तसेवा

शेअर मार्केटमधील विविध सेक्टर्स आणि कंपन्यांचा आकार यासंदर्भात आता अनेकांना माहिती आहे. गुंतवणूक शास्त्राचा विचार करता आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाईड असणे आवश्यक आहे.

- प्रसाद फडणवीस

शेअर मार्केटमधील विविध सेक्टर्स आणि कंपन्यांचा आकार यासंदर्भात आता अनेकांना माहिती आहे. गुंतवणूक शास्त्राचा विचार करता आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाईड असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे गुंतवणूक लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप यासोबतच डेट, हायब्रीड, गोल्ड यांसारख्या विविध ॲसेटमध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेअर बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या सेबीने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय साधी आणि सरळ करण्याच्या हेतूने वर्गीकरण केले. त्या वर्गीकरणानुसार प्रत्येक फंडाची एक स्वतंत्र व्याख्या निश्चित केली. म्युच्युअल फंडाच्या फंड मॅनेजरला त्या वर्गीकरणाच्या बाहेर जाऊन काहीही करता येत नाही.

बीचे फंडसंदर्भातील वर्गीकरण

म्युच्युअल फंडातील डेट वर्गवारीत सर्वच माहिती सविस्तरपणे घेतली आहे. आता आपण इक्विटी प्रकारातील योजना समजून घेऊ. म्युच्युअल फंडांचे नियंत्रण करणाऱ्या सेबीने योजनांचे वर्गीकरण करून ही गुंतवणूक सोपी करण्याचा प्रयत्न केला. शेअर बाजारातील इक्विटी गुंतवणुकीचे प्रमाण निश्चित करून हे वर्गीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यात लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, विविध सेक्टरर्स, वेगवेगळ्या थिमसंदर्भात विचार केला आहे. तसेच रिस्कचाही विचार केला आहे.

शंभर टक्के शेअर बाजारात गुंतवणूक करणारा इक्विटी प्रकार आहे. त्यात १० वेगवेगळ्या प्रकारचे फंड अस्तित्वात आहेत. हायब्रीड वर्गवारीत इक्विटी आणि डेट यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याअंतर्गत ६ प्रकारचे फंड उपलब्ध आहेत. तर रिटायरमेंट, मुलांचे शिक्षण व लग्न विचारात घेऊन सोल्युशन ओरिएंटेड फंड तसेच स्वतंत्र विशेष फंड तयार केले आहेत. त्याअंतर्गत ४ योजना अस्तित्वात आहेत.

इक्विटी म्युच्युअल फंडातील विविध योजना

१. मल्टी कॅप फंड, २. लार्ज कॅप फंड, ३. लार्ज ॲन्ड मिड कॅप फंड, ४. मिड कॅप फंड, ५. स्मॉल कॅप फंड, ६. डिव्हिडंड इल्ड फंड, ७. व्हॅल्यू फंड/कॉट्रा फंड, ८. फोकस फंड, ९. सेक्टोरल/थिमॅटिक फंड, १०. ईएलएसएस फंड

हायब्रीड म्युच्युअल फंडातील विविध योजना

१. कॉन्झरव्हेटीव हायब्रीड फंड, २. बॅलन्स हायब्रीड फंड/ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंड, ३. डॉयनामिक ॲसेट अलोकेशन/बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, ४. मल्टिॲसेट अलोकेशन फंड, ५. आरबीट्राज फंड, ६. इक्विटी सेव्हिंग फंड

सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंडातील विविध योजना

१. रिटायरमेंट फंड, २. चिल्ड्रेनस फंड, ३. इडेक्स फंड, ४. फंड ऑफ फंड

म्युच्युअल फंडातून श्रीमंती

शेअर बाजाराने गेल्या ४२ वर्षात साधारणपणे १५-१७ टक्के परतावा दिला आहे. मात्र गुंतवणूकदारांना तो मिळालेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपली घाबरण्याची वृत्ती. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत आपण व्यावसायिक तज्ज्ञ फंड मॅनेजरच्या माध्यमातून गुंतवणूक करतो. त्यामुळे आपल्या प्रत्येक वेळी शेअरच्या चढ-उतारांकडे लक्ष देण्याची गरज नाही. फंड मॅनेजर आपल्या अनुभवाच्या आधारे आपल्या चांगले रिटर्न म्युच्युअल फंडात देतो, तेव्हा आपल्या आवश्यकतेनुसार विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली तर स्वप्नातील श्रीमंती सहज शक्य आहे.

शेअर बाजारात एखादा शेअर घेतला आणि तो फसला तर नुकसान शक्य आहे. मात्र, म्युच्युअल फंडातील कोणत्याही योजनेत आपण एकाच शेअरमध्ये गुंतवणूक करीत नाही, तर वेगवेगळ्या सेक्टरच्या विविध शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूक करण्याची हीच खरी पद्धत आहे. वरील सर्व २० योजनांच्या प्रकारांची माहिती आपण पुढील भागांमधून घेऊ.

लेखक आर्थिक विषयाचे अभ्यासक आणि सल्लागार आहेत.

मो. ९८६०१५९००२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT