Gaganyaan Mission Sakal
Personal Finance

Gaganyaan Mission: चंद्र-सूर्य मोहिमेनंतर गगनयानची तयारी, चांद्रयानापेक्षा गगनयानचा खर्च आहे 14 पट जास्त

Gaganyaan Mission: गगनयान मिशनचे उड्डाण अंतिम टप्प्यात आहे.

राहुल शेळके

Gaganyaan Mission: 'गगनयान मिशन'चे पहिले चाचणी उड्डाण थांबवले आहे, प्रक्षेपण करण्यापूर्वी रॉकेट 5 सेकंद अगोदर थांबले आणि गगनयान मिशन आज रद्द केले गेले. काही काळानंतर मोठ्या अडथळ्यांची शर्यत आणि आव्हानांचा सामना करत अखेर भारताच्या ‘गगनयान’ची पहिली चाचणी यशस्वी झाली. 

गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणी उड्डाणानंतर, आणखी तीन चाचणी उड्डाणे D2, D3 आणि D4 पाठवली जातील. हे मिशन इस्रोसाठी खूप महत्वाचे आहे कारण पुढील संपूर्ण योजना त्यांच्या यशावरच तयार केली जाईल.

भारताची गगनयान मिशन यशस्वी झाल्यास, भारतीय अंतराळवीरांना अवकाशात अभ्यास करण्याची आणि अवकाशातील वातावरण समजून घेण्याची संधी मिळेल. हे मिशन देशाला अंतराळ संशोधन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाला चांगली दिशा देऊ शकते.

गगनयान मोहिमेचे ध्येय काय आहे?

2025 मध्ये 3 दिवसांच्या मिशनमध्ये 400 किलोमीटर उंचीवर मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हे गगनयान मिशनचे उद्दिष्ट आहे. यानंतर क्रू मॉड्युल समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल.

ही मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. गगनयान मिशनसाठी अंदाजे 90.23 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

चांद्रयानापेक्षा गगनयान मिशनला किती खर्च येणार?

अंदाजानुसार, गगनयान मिशन चांद्रयान 3 पेक्षा 14 पट जास्त महाग असू शकते. गगनयान मिशनसाठी सुमारे 9,023 कोटी रुपये खर्च आला आहे. तर चांद्रयान 3 च्या मोहिमेसाठी 650 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. इस्रोच्या आदित्य एल1 मिशनचे बजेट 400 कोटी रुपये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT