Kotak Mahindra Bank's joint managing director KVS Manian resigns  Sakal
Personal Finance

KVS Manian: कोटक महिंद्रा बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक मनियन यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण?

KVS Manian: कोटक महिंद्रा बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक KVS Manian यांनी राजीनामा दिला आहे. बँकेने 30 एप्रिल रोजी आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. “कृष्णन वेंकट सुब्रमण्यन (KVS मनियन ) हे आता बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक नाहीत,”

राहुल शेळके

KVS Manian: कोटक महिंद्रा बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक KVS Manian यांनी राजीनामा दिला आहे. बँकेने 30 एप्रिल रोजी आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. “कृष्णन वेंकट सुब्रमण्यन (KVS मनियन ) हे आता बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक नाहीत,” असे एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. त्यांचा राजीनामा तत्काळ स्वीकारण्यात आला आहे.

मनियन गेल्या 30 वर्षांपासून कोटक महिंद्रा बँकेत काम करत होते आणि जानेवारीत झालेल्या फेरबदलात त्यांची बढती झाली. मनियन यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, आर्थिक सेवांमधील संधी शोधण्यासाठी मी कोटक महिंद्रा बँकेचा राजीनामा देत आहे. यामुळे मी बँकेच्या संचालकपदावरूनही पायउतार होणार आहे.

त्यांनी आयआयटी, बीएचयूमध्ये शिक्षण घेतले असून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून आर्थिक व्यवस्थापनाची पदवी देखील घेतली आहे.

कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, बँकेच्या उपव्यवस्थापकीय संचालक शांती एकबराम या इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि संस्थात्मक इक्विटीज आणि मालमत्ता व्यवसायाची जबाबदारी स्वीकारतील. जी यापूर्वी मनियन हाताळत होते. याशिवाय बँकेचे नवे एमडी आणि सीईओ अशोक वासवानी थेट घाऊक, व्यावसायिक आणि खासगी बँकेचे काम पाहतील.

वासवानी म्हणाले, 'मनियन यांनी कोटक महिंद्रा बँकेसोबत 29 वर्षे घालवली आहेत आणि आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. 30 एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकेचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 1.01 टक्क्यांनी घसरून 1,623.75 रुपयांवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT