LPG Cylinder Price became cheaper by Rs 57 check new LPG rates  Sakal
Personal Finance

LPG Cylinder: दिवाळीनंतर आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 57 रुपयांनी झाला स्वस्त, काय आहेत नवीन दर?

LPG Cylinder Price Today: नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

राहुल शेळके

LPG Cylinder Price Today: दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याच्या बातम्या येत असतानाच आता दिलासा देणारी बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी आज, गुरुवार, 16 नोव्हेंबर 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.

19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत थोडासा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी (OMCs) किंमत 57.50 रुपयांनी कमी केली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

दिवाळीपूर्वी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

नवीन दर काय आहेत?

नवीन बदलानंतर, 19 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 1755.50 रुपये, कोलकात्यात 1885.50 रुपये, मुंबईत 1728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1942 रुपये प्रति सिलेंडर आहे.

घरगुती सिलेंडरची किंमत किती आहे?

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.

दिवाळीच्या आधी म्हणजेच 1 तारखेला व्यावसायिक सिलिंडरचे दर 101.50 रुपयांनी वाढले होते. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सरकारने 30 ऑगस्ट रोजी 200 रुपयांची कपात केली होती

30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. त्यावेळी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 400 रुपयांची कपात जाहीर करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT