Mahindra and Mahindra’s Canada-based associate firm files for winding up; stock drops 3 percent  Sakal
Personal Finance

Canada-India Row: गुंतवणूकदारांना मोठा झटका! भारत कॅनडा वादात महिंद्राने कॅनडामधील व्यवसाय केला बंद

Canada-India Row: भारत कॅनडा वादाचा परिणाम कंपन्यांवर होताना दिसत आहे.

राहुल शेळके

Canada-India Row : भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढला आहे. आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आणि आता सरकारने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. भारताने उचललेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला. त्याचा परिणाम आता व्यवसायावरही दिसून येत आहे.

दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने गुरुवारी सांगितले की त्यांची कॅनडा-आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने काम थांबवले आहे.

कंपनीने काय सांगितले?

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, "रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून 20 सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे."

यानंतर रेसनने आपले काम बंद केले. महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स आज गुरुवारी 3% पेक्षा जास्त घसरले आणि 1,584.85 रुपयांवर पोहोचले.

काय आहे प्रकरण?

सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत कॅनडा सरकारच्या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. खरं तर, या वर्षी जूनमध्ये हरदीप सिंह निज्जर नावाच्या कॅनडाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

त्याला जुलै 2020 मध्ये भारताने 'दहशतवादी' घोषित केले होते. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. त्यामुळे हा वाद झाला आहे.

भारतीय कंपन्यांसाठी कॅनडा किती महत्त्वाचा आहे हे त्यांच्या गुंतवणुकीवरून कळू शकते. मे 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'फ्रॉम इंडिया टू कॅनडा - इकॉनॉमिक इम्पॅक्ट अँड एंगेजमेंट' या अहवालानुसार, भारतीय कंपन्या कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात.

सीआयआयने हा अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये भारताने कॅनडात किती गुंतवणूक केली हे सांगितले होते. कॅनडात भारतीय उद्योगांची वाढती उपस्थिती, भारतीय कंपन्यांचा तेथील रोजगारावर होणारा परिणाम, या सगळ्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.

या अहवालानुसार 30 हून अधिक भारतीय कंपन्यांनी कॅनडात गुंतवणूक केली आहे. कंपन्यांनी कॅनडामध्ये 40,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतीय कंपन्या कॅनडामध्ये 17 हजारांहून अधिक नोकऱ्या देत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावाचा परिणाम कंपन्यांवर होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT