Ration Card Sakal
Personal Finance

Ration Card: मोफत रेशनकार्ड धारकांना मोदी सरकारचा मोठा धक्का! गहू आणि तांदूळ विक्रीवर घातली बंदी

केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

Food Corporation of India: तुम्हीही केंद्र आणि राज्य सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन अपडेटनुसार, केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना तांदूळ आणि गव्हाची विक्री थांबवली आहे. गरीबांना मोफत अन्नधान्य पुरवणाऱ्या कर्नाटकसह काही राज्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.

कर्नाटक सरकारला आधीच कळवले:

केंद्राकडून या निर्णयाची माहिती कर्नाटक सरकारला आधीच देण्यात आली होती. कर्नाटकने ई-लिलावाशिवाय OMSS अंतर्गत योजनेसाठी जुलै महिन्यासाठी 3,400 रुपये प्रति क्विंटल दराने 13,819 टन तांदूळ मागितला होता.

भारतीय खाद्य महामंडळाने (FCI) जारी केलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारांना OMSS अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे.

अशा राज्यांना स्वस्त धान्य मिळणार:

 Economic Times ने दिलेल्या वृत्तानुसार OMSS अंतर्गत, ईशान्येकडील राज्ये, डोंगराळ राज्ये आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी प्रति क्विंटल 3,400 रुपये विक्री सुरू राहील.

बाजारातील किंमती कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार FCI OMSS अंतर्गत खाजगी व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून तांदूळ दिला जाऊ शकतो.

12 जून रोजी, केंद्राने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्यासाठी OMSS अंतर्गत तांदूळ-गहू देण्याची घोषणा केली होती.

सरकारने OMSS अंतर्गत 15 लाख टन गहू केंद्र सरकारकडून खाजगी व्यापारी आणि गहू उत्पादनांच्या उत्पादकांना ई-लिलावाद्वारे विकण्याची घोषणा केली होती.

या व्यापाऱ्यांना OMSS अंतर्गत विक्रीसाठी असलेल्या तांदळाचे प्रमाण निश्चित करण्यात आले नव्हते. केंद्र सरकारने 26 जानेवारी 2023 राजी OMSS धोरण आणले होते.

या अंतर्गत राज्यांना त्यांच्या योजनांसाठी ई-लिलावात भाग न घेता FCI कडून तांदूळ आणि गहू दोन्ही खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये सातेरीच्या दरीत पाचशे फुट चारचाकी कोसळली, वाहनात पती पत्नी; बचावकार्य सुरू

Nobel Prize in Medicine 2025: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर! मेरी ई. ब्रन्को, फ्रेड रॅम्सडेल अन् शिमोन सकागुची ठरले पुरस्काराचे मानकरी

Vijay Deverakonda Accident:'डोक्याला मार लागलाय', अपघातनंतर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया, म्हणाला...'दुखतय पण...'

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Kolhapur Lodge Raid : गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्...

SCROLL FOR NEXT