Gold Jewellery Import Sakal
Personal Finance

Gold Rate: सत्तेवर येताच मोदी सरकारचा मोठा निर्णय; सोन्याचे भाव आणखी वाढणार? अधिसूचना केली जारी

Gold Jewellery Import: सरकारचे मत आहे की, HSN कोड अंतर्गत दागिन्यांच्या आयातीवर बंदी नाही. उलट, आयातीतील वाढीचे कारण शोधणे आणि इतकी आयात कोठून होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी त्याला पाळत ठेवण्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

राहुल शेळके

Gold Jewellery Import: केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर मोठा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीला मंजुरी घ्यावी लागणार आहे. DGFT ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, परदेशातून मोती, विशिष्ट प्रकारचे हिरे आणि इतर मौल्यवान दगडांनी जडलेले सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आणि ते भारतात आणण्यासाठी आयात धोरण 'मुक्त ते प्रतिबंधित' श्रेणीतून बदलले जाईल. या प्रतिबंधित श्रेणीमध्ये ठेवलेल्या वस्तूंची आयात करण्यासाठी, सरकारकडून परवाना/परवानगी आवश्यक आहे.

सोन्यावर किती कर आकारला जातो?

15 टक्के आयात कर सोन्या-चांदीच्या बारवर लावला जातो. तर यापूर्वी सोने आणि चांदीच्या बारवर 11 टक्के आयात कर आकारला जात होता. नव्या निर्णयानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीला मंजुरी घ्यावी लागणार आहे. 5 श्रेणीतील दागिन्यांच्या आयातीसाठी मंजुरी आवश्यक आहे. एफटीए देशांमधून दागिन्यांची आयात अचानक वाढत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Gold Import

सरकारचे मत आहे की, HSN कोड अंतर्गत दागिन्यांच्या आयातीवर बंदी नाही. उलट, आयातीतील वाढीचे कारण शोधणे आणि इतकी आयात कोठून होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी त्याला पाळत ठेवण्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. भारताच्या एकूण सोन्याच्या आयातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये व्यापार तूट 5 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

देशाच्या एकूण आयातीत सोन्याचा वाटा 5 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. सध्या सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क लावले जाते. चीननंतर भारत हा सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. ही आयात प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करते. सरकारच्या या निर्णयामुळे परिणामी आयात कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

FTA म्हणजे काय?

FTA हा एक मुक्त व्यापार करार आहे म्हणजेच त्याला मुक्त व्यापार करार म्हणतात. याद्वारे दोन देशांमध्ये करार केला जातो. या करारांतर्गत दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ करण्याचे काम केले जाते. जेव्हा दोन देशांदरम्यान एफटीएवर स्वाक्षरी केली जाते, तेव्हा आयात-निर्यात म्हणजेच त्या देशांमध्ये खरेदी आणि विक्री केलेल्या उत्पादनांना आयात कर, नियामक कायदे, अनुदान आणि कोटा इत्यादींमधून सूट दिली जाते किंवा नियम सोपे केले जातात.

यामुळे वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा खर्च कमी होतो. त्यामुळे त्या देशांतील लोकांना वस्तू स्वस्तात मिळतात आणि कंपन्या अधिक नफा मिळवू शकतात. यामुळे व्यवसायात लक्षणीय वाढ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील हरित ऊर्जेच्या पुरवठ्यात वाढ, टाटा पॉवरचा तीन कंपन्यांसोबत करार

UP Government : ​योगी सरकारची मोठी ॲक्शन; समाज कल्याण विभागाचे ४ अधिकारी बडतर्फ, ३ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन कपातीचे आदेश

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात Viral Video

SCROLL FOR NEXT