More than Rs 50 thousand crore business done on Dhanteras 2023 CAT claims  Sakal
Personal Finance

Dhanteras 2023: धनत्रयोदशीला पडला पैशांचा पाऊस; बाजारात झाला 50,000 कोटींचा व्यवसाय, CATचा दावा

Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील किरकोळ बाजारात मोठी गर्दी दिसून आली.

राहुल शेळके

Dhanteras 2023: शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील किरकोळ बाजारात मोठी गर्दी दिसून आली. सोने-चांदीशिवाय वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडी व इतर उत्पादनांची चांगली खरेदी-विक्री झाली.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या मते, धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील किरकोळ बाजारात 50,000 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली. एकट्या दिल्लीत 5,000 कोटी रुपयांची खरेदी-विक्री झाली. गेल्या धनत्रयोदशीला एकूण 35,000 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता.

संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी वातावरण अतिशय चांगले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 43 टक्के अधिक विक्री झाली आहे. धनत्रयोदशीच्या एकूण विक्रीत वाहनांचा वाटा 5,000 कोटी रुपये होता.

3,000 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विक्री झाली. 1,000 कोटी रुपयांची भांडी विकली गेली, तर 300 कोटी रुपयांच्या पूजा साहित्यांची खरेदी-विक्री झाली. याशिवाय लक्ष्मी-गणेश मूर्ती, मातीचे दिवे, सजावटीचे साहित्य, बंडनवार, झाडू यांची विक्रीही गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली झाली.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या विक्रीत 20% वाढ

धनत्रयोदशीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 15-20 टक्क्यांनी अधिक होती. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष अग्रवाल म्हणाले, धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व शहरांमध्ये चांगली गर्दी दिसून आली. मागील धनत्रयोदशीच्या तुलनेत उत्पादनांच्या विक्रीत 15 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) संचालक दिनेश जैन म्हणाले की, सोन्याचे भाव व्यवसायासाठी अनुकूल आहेत. किंमतीत नुकत्याच झालेल्या घसरणीला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हिऱ्यांच्या किंमती घसरल्याने तरुण पिढीमध्ये हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी होती.

400 टन चांदीचे दागिने विकले

अखिल भारतीय ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाले की, देशभरात सुमारे चार लाख लहान-मोठे ज्वेलर्स आहेत. यापैकी 1.85 लाख ज्वेलर्स ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) मध्ये नोंदणीकृत आहेत.

2.25 लाख लहान ज्वेलर्स अशा भागात आहेत जिथे BIS मानके अद्याप लागू नाहीत. या सर्व गोष्टींसह 41 टन सोने आणि 400 टन चांदीचे दागिने आणि नाण्यांची धनत्रयोदशीला विक्री झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT