New Rules From 1st May
New Rules From 1st May Sakal
Personal Finance

New Rules From 1st May: बँक ते GST...1 मे पासून बदलणार 'हे' नियम, जाणून घ्या एका क्लिकवर

राहुल शेळके

New Rules From 1st May 2023: आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला अनेक नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अशा काही नियमांमध्ये बदल केला जातो ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो.

मे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला GST, म्युच्युअल फंड आणि बँकिंगसह अनेक ठिकाणी मोठे बदल दिसतील. यावेळी नियमांमध्ये कोणते बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.

जीएसटी नियमांमध्ये होणार बदल:

आत्तापर्यंत GST इनव्हॉइस तयार करण्याच्या आणि अपलोड करण्याच्या तारखेसाठी अशी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नव्हती. पण आता मे महिन्याच्या सुरुवातीपासून व्यावसायिकांसाठी जीएसटीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

नवीन नियमांनुसार, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना 7 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) व्यवहाराची पावती अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गॅससाठी नवीन दर जाहीर केले जातील:

केंद्र सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी, सीएनसी-पीएनजीच्या किंमती बदलून नवीन दर जारी करते. गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसला तरी सरकारने एलपीजीच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती.

त्यानंतर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,028 रुपये झाली. यावेळी एलपीजीसोबतच सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल होऊ शकतो.

म्युच्युअल फंडातही केवायसी करणे आवश्यक:

आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीशी संबंधित इतर सर्व प्लॅटफॉर्मप्रमाणे, आता म्युच्युअल फंडमध्येही केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे.

बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना हे निश्चित करण्यास सांगितले आहे की गुंतवणूकदारांनी केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.

हा नियम 1 मे पासूनच लागू होणार आहे. म्हणजेच आता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे करता येणार आहे.

पीएनबी एटीएम व्यवहारावर शुल्क आकारले जाईल:

तुमचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असल्यास, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे नसल्यास आणि तुम्ही एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास आणि व्यवहार न झाल्यास बँकेकडून शुल्क आकारले जाणार आहे. तुमच्याकडून शुल्क म्हणून जीएसटीसह 10 रुपये आकारले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT