Narayana Murthy
Narayana Murthy Sakal
Personal Finance

Narayana Murthy : 'अशा सापळ्यात अडकू नका...' नारायण मूर्तींचा तरुणाईला मोलाचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

Narayana Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमवर टीका केली आहे. तसेच त्यांनी एकाच वेळी दोन नोकऱ्या करणाऱ्यांवर पण टीका केली आहे.

त्यांनी मून लाइटिंग आणि वर्क फ्रॉम होम न करण्याचा सल्ला दिला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र आणि पुण्यातील परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या एशियन इकॉनॉमिक डायलॉग 2023 मध्ये नारायण मूर्ती बोलत होते. (Infosys Cofounder Narayana Murthy On Work From Home)

कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले, "मी आठवड्यातून तीन दिवस कामावर येईल आणि बाकीचे दिवस घरातून काम करेल तसेच मून लाइटिंग (दोन-दोन नोकर्‍या) करेल. आपण या सापळ्यात अडकणार नाही.

लवकर निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, त्रासांपासून मुक्त व्यवहार असणारे बिजनेस तयार करण्याची आपल्याया आवश्यकता आहे.''

नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, ''जर भारताला विकसनशील राष्ट्र बनायचे असेल तर लोकांचे जीवन सुधारणे आवश्यक आहे आणि व्यवसाय सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी सोडवाव्या लागतील.''

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताच्या आर्थिक वाढीची तुलना चीनशी केली आहे. ते म्हणाले की, ''शेजारचा देश आपल्यापेक्षा जास्त प्रगती करीत आहे कारण त्या देशाने तरुणाईमध्ये बदल केला आहे.

40 च्या दशकात भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार समान होता, परंतु आता ते आपल्यापेक्षा सहापट वाढला आहे. यामागचे कारण असे की, त्या देशाने व्यवसाय संस्कृती स्वीकारली आहे.''

नारायण मूर्ती म्हणाले, ''भारताचा एक छोटासा वर्ग कठोर परिश्रम करतो, तो प्रामाणिक आहे. त्या वर्गाकडे चांगले काम करण्याची शिस्त आणि कार्यशैली आहे.''

नारायण मूर्ती पुढे म्हणाले, ''भारतातील व्यावसायिकांनी केवळ भारतात राहून भारतात व्यवसाय करावा असे केल्याने मला आनंद होईल.

व्यवसामधील निर्णय जलद घ्यावेत. ते शक्य तितक्या लवकर अंमलात आणले पाहिजेत. व्यावसायिकाला त्रास देऊ नये. भारतात एक कमतरता देखील आहे की, आपल्याकडे बाजारपेठेतील संशोधनात विशेष तज्ञ असलेली कोणतीही कंपनी नाही.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT