Odisha Train Accident Sakal
Personal Finance

Odisha Train Accident: अदानी पाठोपाठ अंबानींचीही बालासोर ट्रेन दुर्घटनेतील पीडितांना मदत

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे.

राहुल शेळके

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. एकापाठोपाठ तीन गाड्यांची धडक होऊन 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले.

देशात तब्बल 30 वर्षांनंतर हा सर्वात मोठा आणि भीषण रेल्वे अपघात आहे. या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे.

याशिवाय अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. आता मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी, नीता अंबानींचे रिलायन्स फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

उपचारासाठी रिलायन्स फाऊंडेशन मदत करणार:

रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत हँडलने ट्विट केले की ते बाधितांच्या उपचारांना मदत करेल आणि त्यांची आयुष्य पुर्ववत करण्यास मदत करेल. फाउंडेशनने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पीडितांच्या पाठीशी उभे आहोत.

ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

रिलायन्स फाऊंडेशनने ट्विटर हँडलवर सांगितले की, आम्ही या अपघातात बळी पडलेल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहोत.

रिलायन्स फाऊंडेशन पीडितांच्या उपचारासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. दुसरीकडे, रिलायन्स फाऊंडेशनची टीम ऑन ड्युटी अधिकाऱ्यांना मदत करण्यात तसेच बचाव कार्यात गुंतलेली आहे.

अदानी समूहानेही जाहीर केली मदत:

देशातील श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी रविवारी ट्विट केले की, अदानी फाऊंडेशन रेल्वे अपघातात त्यांचे पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करेल. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ओडिशातील रेल्वे दुर्घटना अत्यंत अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे.

अदानी समूहाने सांगितले की, पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आणि मुलांना चांगले भविष्य देणे ही त्यांची संयुक्त जबाबदारी आहे. त्यांनी ट्विट केले की, ओडिशा रेल्वे अपघातामुळे सर्वांनाच दु:ख झाले आहे.

या दुर्घटनेत ज्यांनी आपले पालक गमावले, त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याचे आम्ही ठरवले आहे. त्याला पाठिंबा देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT