Income Tax Return Sakal
Personal Finance

Income Tax Return: उरलेत शेवटचे दोन दिवस, नाहीतर भरावा लागणार 5,000 रुपयांचा दंड, असा भरा 15 मिनिटांत ITR

Online ITR Filing Process: आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

राहुल शेळके

Online ITR Filing Process: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत संपत आली आहे. जर तुम्ही प्राप्तिकराच्या कक्षेत येत असाल तर ITR भरण्यासाठी फक्त आज आणि उद्या वेळ आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे.

यानंतर आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागेल. कारण आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. जर तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत तुमचा ITR दाखल केला नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

31 जुलैनंतर आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीचे एका वर्षात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्याला दंड म्हणून 5,000 रुपये भरावे लागतील.

जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. दंडासह उशीरा रिटर्न भरण्याचा पर्याय 31 डिसेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे.

आयटीआर भरताना, लक्षात ठेवा की यावेळी नवीन कर व्यवस्था डिफॉल्टमध्ये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर फाइल करायचा असेल तर तुम्हाला त्याचे स्वतःच रूपांतरित करावे लागेल.

नवीन कर प्रणालीमध्ये कर सूट मिळविण्यासाठी खूप मर्यादित पर्याय आहेत. 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. त्याच वेळी, जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढविण्यात आलेली नाही. पण तिथे तुम्ही सरकारी बचत योजनांमध्ये आणि इतर मार्गांनी गुंतवणूक करून कर सवलतीचा दावा करू शकता.

नवीन कर स्लॅब

0 ते 3 लाख 0 टक्के

  • 3 ते 6 लाखांवर 5 टक्के

  • 6 ते 9 लाखांवर 10 टक्के

  • 9 ते 12 लाखांवर 15 टक्के

  • 12 ते 15 लाखांवर 20 टक्के

  • 15 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के

जुना आयकर स्लॅब

  • 2.5 लाखांपर्यंत - 0 टक्के

  • 2.5 लाख ते 5 लाख - 5 टक्के

  • 5 लाख ते 10 लाख - 20 टक्के

  • 10 लाखाच्या वर - 30 टक्के

ITR भरताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • योग्य ITR फॉर्म निवडा.

  • उत्पन्नाची योग्य माहिती द्या.

  • करमुक्त उत्पन्नाबद्दल चुकीची माहिती देऊ नका.

  • योग्य वैयक्तिक माहिती द्या.

  • फॉर्म 2AS डाउनलोड करणे आवश्यक आहे आणि ते तुमच्या उत्पन्नाशी जुळले पाहिजे.

आयकर विभागाने सांगितले की आमचा हेल्पडेस्क करदात्यांना मदत करण्यासाठी 24x7 कार्यरत आहे. हे लोकांना आयटीआर फाइल करण्यापासून ते कर भरण्यापर्यंतच्या सेवांसाठी मदत करत आहे. हेल्प डेस्क कॉल, लाइव्ह चॅट आणि सोशल मीडियाद्वारे मदत करत आहे.

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या ITR फाइल करू शकता

  • आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर (https://eportal.incometax.gov.in/) जा.

  • यानंतर होमपेजवर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.

  • डॅशबोर्डवर, ई-फाइल > इन्कम टॅक्स रिटर्न > 'फाइल इन्कम टॅक्स रिटर्न' वर क्लिक करा.

  • नंतर मूल्यांकन वर्ष निवडा, जसे की 2023-24, आणि 'continue' वर क्लिक करा.

  • आता ITR दाखल करण्याची पद्धत निवडा आणि ऑनलाइन पर्याय निवडा.

  • आता तुमचा आयटीआर फॉर्म तुमच्या कर उत्पन्न आणि टीडीएसनुसार निवडा.

  • तुमच्यासाठी लागू असलेला ITR निवडल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवून, स्टार्ट पर्यायावर क्लिक करा.

  • कागदपत्रांनुसार, तुमचे उत्पन्न आणि कपातीचा तपशील वेगवेगळ्या विभागांमध्ये भरा.

  • जर कोणतेही कर दायित्व आले नसेल, तर कर भरल्यानंतर 'प्रिव्ह्यू रिटर्न' वर क्लिक करावे लागेल.

  • नंतर 'प्रिव्ह्यू रिटर्न सबमिट करा' चेकबॉक्सवर क्लिक करा आणि 'validation' पर्याय निवडा.

  • रिटर्नची पडताळणी आणि ई-व्हेरिफाय करणे बंधनकारक आहे.

  • ई-व्हेरिफिकेशन पेजवर, तुम्हाला ई-व्हेरिफिकेशन करायचे आहे तो पर्याय निवडा आणि 'Continue' वर क्लिक करा.

  • एकदा तुम्ही रिटर्न ई-व्हेरिफाय केल्यानंतर, फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल.

  • ट्रान्झॅक्शन आयडी आणि पोचपावती क्रमांक स्क्रीनवर दिसतो, जेणेकरून तुम्ही भविष्यात तुमच्या ITR फॉर्मची स्थिती तपासू शकता.

  • तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जो ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आहे, त्यावर तुम्हाला फॉर्म भरल्याचा मेसेज येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT