PF Diwali Gift For Employees, Government Starts Crediting Interest  Sakal
Personal Finance

EPFO Interest: मोदी सरकारची दिवाळी भेट; कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे

PF Account Interest Rate: दिवाळीची सुरुवात होताच पीएफ खातेधारकांना मोठी भेट मिळाली आहे

राहुल शेळके

PF Account Interest Rate: दिवाळीची सुरुवात होताच पीएफ खातेधारकांना मोठी भेट मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे येऊ लागले आहेत. ईपीएफओने पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी पीएफ खात्यावरील व्याजदर 8.15 टक्के आहे. काही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर व्याजाचे पैसे आधीच जमा झाले आहेत.

EPFO ​​चे व्याजदर दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) आणि वित्त मंत्रालयाद्वारे ठरवले जातात. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जून 2023 मध्ये व्याजदर जाहीर केले होते. यानंतर सरकारने व्याजदराचे पैसे पीएफ खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे.

ईपीएफओने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा सुरळीत केली जात आहे. यापुढे व्याजाचे पैसे खात्यात जमा होण्यास कमी वेळ लागेल. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, यापूर्वीच 24 कोटी रुपयांपेक्षा जास्त पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात येणारे पैसे टेक्स्ट मेसेज, मिस्ड कॉल, उमंग अॅप किंवा EPFO ​​वेबसाइटद्वारे तपासू शकता.

पीएफ खात्यावरील व्याज दर दरवर्षी ईपीएफओद्वारे ठरवले जाते. व्याजदर ठरवण्यासाठी EPFO ​​ला अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत करावी लागते. व्याजदर ठरवताना सरकारी रोख्यांचे व्याजदर, चलनवाढीचा दर आणि अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेतली जाते.

तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही ते सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही मेसेज, मिस्ड कॉल, उमंग अॅप किंवा ईपीएफओ वेबसाइटची मदत घेऊ शकता.

मेसेजद्वारे शिल्लक तपासण्यासाठी, तुम्हाला तुमच्या EPFO ​​नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर मेसेज पाठवावा लागेल. याशिवाय तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल पाठवूनही शिल्लक तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT