Raghuram Rajan on wealth distribution says Elevate, rather than bringing the successful down  Sakal
Personal Finance

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

Raghuram Rajan on wealth distribution idea: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संपत्ती वितरणाबाबत मत व्यक्त केले आहे. केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राहुल शेळके

Raghuram Rajan on wealth distribution idea: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संपत्ती वितरणाबाबत मत व्यक्त केले आहे. केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथे एका कार्यक्रमात बोलताना राजन म्हणाले की, सर्वसमावेशक वाढीमुळे विकासाचा वेग वाढेल, परंतु श्रीमंतांवर कर लावणे हा उपाय नाही.

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील शिकागो येथे मालमत्ता वितरणाबाबत विधान केले होते. ते म्हणाले होते की, "अमेरिकेत वारसा कर आहे. जर कोणाकडे 100 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर तो फक्त 45 टक्के मालमत्ता आपल्या मुलांना हस्तांतरित करू शकतो. काँग्रेस सत्तेत आल्यास भारतीयांच्या संपत्तीचे पुनर्वितरण करेल.''

काँग्रेसने पित्रोदा यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून, लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात किंवा न्याय पत्रात संपत्तीच्या पुनर्वितरणाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. पक्षाच्या जाहीरनाम्यात किंवा न्याय पत्रामध्ये उत्पन्न असमानता, भारताची संपत्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक आणि सरकारी मालकीच्या जमिनी आणि संसाधनांचे वाटप यांचा उल्लेख आहे.

राजन म्हणाले की, "मला वाटते की जे लोक चांगले काम करत नाहीत त्यांना प्रत्यक्षात चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करु शकतो आणि त्यामुळे सर्वसमावेशक विकासाचा वेग वाढेल. मी असे म्हणत नाही की, श्रीमंतांवर मोठ्या प्रमाणावर कर लावा.'' राजन यांनी असेही प्रतिपादन केले की अर्थव्यवस्थेतील ज्या घटकांना फायदा झाला नाही त्या घटकांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.  

मणिपूरमधील वांशिक कलहाबद्दल बोलताना राजन यांनी नमूद केले की, भारतात जे काही घडत आहे ते दोन समुदायांमधील भांडण नाही. एका समाजाला दुसऱ्या समाजापेक्षा जास्त मिळतंय हे लक्षात आल्याने हे नोकरी आणि आरक्षणासाठीची लढाई असल्याचा दावा राजन यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wish PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

SCROLL FOR NEXT