Rakesh Jhunjhunwala Sakal
Personal Finance

Rakesh Jhunjhunwala: 5 हजार ते 40 हजार कोटींचे मालक, असा होता शेअर बाजारातील 'बिग बुल'चा प्रवास

केवळ 5,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करुन 40,000 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले

राहुल शेळके

Rakesh Jhunjhunwala Birth Anniversary: भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आता आपल्यात नसले तरी त्यांच्या संघर्षाचा प्रवास आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

आज त्यांच्या 63 व्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी केवळ 5,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करुन 40,000 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. राजस्थानच्या झुंझुनूशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या नावासोबत झुनझुनवाला जोडले गेले. गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

शेअर बाजारातील त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास इतका यशस्वी होता की त्यांना 'बिग बुल' म्हटले गेले आणि त्यांना भारताचे 'वॉरेन बफे' ही पदवी मिळाली. त्यांच्या असामान्य कामगिरीमुळे, भारत सरकारने त्यांना या वर्षी मरणोत्तर पद्मश्री देऊन सन्मानित केले.

गेल्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांच्याकडे सुमारे 40,000 कोटी रुपयांची संपत्ती होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एवढी संपत्ती कमावलेल्या व्यक्तीचा प्रवास फक्त 5,000 रुपयांपासून सुरू झाला. राकेश झुनझुनवाला यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत शेअर बाजार होता आणि या बाजाराने त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवले.

वडिलांकडून प्रेरणा

झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये दलाल स्ट्रीटवर पाऊल ठेवले. शेअर मार्केटमध्ये येण्याची प्रेरणा त्यांना वडिलांकडून मिळाली. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या झुनझुनवाला यांनी पहिल्यांदा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला.

यासोबतच वडिलांनी मित्र किंवा नातेवाईकाकडून कर्ज घेऊन बाजारात पैसे गुंतवू नयेत, अशा सूचनाही दिल्या. यानंतर झुनझुनवाला यांनी आधी काही पैसे कमावले आणि नंतर बाजारात गुंतवणूक केली.

टाटा टीने बनवले लखपती

झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये 5,000 रुपये गुंतवणूकदार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांना यशस्वी करण्यात टाटा समूहाच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. एकेकाळी त्यांनी टाटा टी या टाटा समूहाच्या कंपनीचे 5,000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले.

तीन महिन्यांत टाटा चहाचे शेअर्स खूप वाढले. त्यानंतर झुनझुनवाला यांनी ते 143 रुपयांना विकले. ही गोष्ट 1986 च्या सुमारास आहे. झुनझुनवाला यांनी या डीलमधून 2.15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन महिन्यांत पाच लाख रुपयांचा नफा झाला.

टायटनने बनवले बिग बुल

त्यानंतरच्या तीन वर्षांत त्यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचा नफा कमावला. टाटा समूहाच्या आणखी एका कंपनीने त्यांना बिगबुल बनवले. 2003 मध्ये त्यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये पैसे गुंतवले.

त्यानंतर त्यांनी टायटनचे सहा कोटी शेअर्स प्रत्येकी 3 रुपयांना विकत घेतला. एकेकाळी झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे सुमारे 4.5 कोटी शेअर्स होते, ज्याचे मूल्य 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

पोर्टफोलिओमध्ये शेवटपर्यंत टाटाचे शेअर्स

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये शेवटपर्यंत टाटा शेअर्सचा मोठा हिस्सा होता. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये SAIL, Tata Motors, Tata Communications, Lupin, TV18, DB Realty, Indian Hotels, Indiabulls Houseing Finance, Federal Bank, Karur Vaishya Bank, Escorts Ltd, Titan Company, MCX या शेअर्सचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT