RBI Alert several banks for cyber risks suggets ways to improve security and fill gaps Sakal
Personal Finance

RBI Alert: भारतीय बँकांवर सायबर हल्ल्याचा धोका वाढला; RBIने बँकांना दिला इशारा, काय आहे प्रकरण?

Cyber Risk on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच RBI ने बँकांना सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे.

राहुल शेळके

RBI Cyber Threat Alert: : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच RBI ने बँकांना सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. आरबीआयने सांगितले की तपासणीमध्ये कुठेही त्रुटी असतील तर त्यावर काम करा.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांनी आधीच सांगितले होते की बँकिंग क्षेत्राला नवीन सायबर सुरक्षा धोक्यांसाठी तयार राहण्याची गरज आहे. ग्राहकांचा आणि इतर गोष्टींचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले होते.

एआयच्या गैरवापराचे धोके ओळखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी बँकांना त्यांच्या एनक्रिप्टेड सिस्टमची पुनर्रचना करावी लागेल यावर त्यांनी प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, आपल्याला AI मधील समस्या देखील समजून घेणे आवश्यक आहे.

डिजिटल बँकिंग वाढल्याने सायबर हल्ल्यांचे धोकेही वाढले आहेत. यासाठी सायबर आणि आयटीचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज आहे. CSight अंतर्गत, RBI ची तपासणी पथक सर्व बँकांच्या IT प्रणालीची तपासणी करते.

अलिकडच्या वर्षांत बँकिंग प्रणालीमध्ये सायबर सुरक्षा हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर आरबीआयकडून हा इशारा देण्यात आला आहे. भारतीय बँकांनी जून 2018 ते मार्च 2022 या कालावधीत हॅकर्सकडून 248 डेटांच्या चोरीची नोंद झाली आहे.

भारत सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार 248 पैकी 41 प्रकरणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील आहेत तर खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये 205 प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच परदेशी बँकांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

बँकांच्या कामावर ग्राहक नाराज

देशात ऑनलाइन बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने बँकिंग क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. अलीकडच्या काळात ऑनलाइन पेमेंटचा डेटा झपाट्याने वाढला आहे. या वाढीदरम्यान बँकांशी संबंधित ग्राहक त्यांच्या बँकांच्या कामावर समाधानी नाहीत.

देशातील बँका मग ते खाजगी असोत की सरकारी, त्यांच्या कामामुळे ग्राहकांना समाधानी करता आलेले नाहीत, असे नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालातून समोर आले आहे.

अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकपाल योजनांतर्गत आलेल्या तक्रारींबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बँकेच्या कामकाजाशी संबंधित तक्रारी अधिक असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ एका वर्षात बँकांनी त्यांच्या कामात कोणतीही सुधारणा केलेली नाही.

या अहवालानुसार, 2022-23 मध्ये लोकपाल योजनांतर्गत आरबीआयकडे दाखल झालेल्या तक्रारींमध्ये 68 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. म्हणजेच यावेळी एकूण तक्रारींची संख्या 7 लाखांहून अधिक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT