Bank FD Sakal
Personal Finance

Unclaimed Money: RBI बचत आणि चालू खात्याबाबत बदलणार नियम; 1 जूनपासून होणार मोठे बदल, बँक करणार...

1 जूनपासून बचत आणि चालू खात्यात मोठा बदल होणार आहे.

राहुल शेळके

Unclaimed Deposits: 1 जूनपासून बचत आणि चालू खात्यात मोठा बदल होणार आहे. हा बदल दावा न केलेल्या ठेवींबाबत असेल. यासाठी आरबीआयने 100 दिवस 100 मोहीम सुरू केली आहे. बँकांना या मुदतीच्या आत या ठेवींची सेटलमेंट करावी लागेल.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर बचत आणि चालू खात्यात 10 वर्षे चालू नसलेली रक्कम शिल्लक राहिली असेल किंवा मॅच्युरिटीच्या तारखेपासून 10 वर्षांच्या आत कोणीही त्यावर दावा केला नसेल, तर ती दावा न केलेली ठेव मानली जाईल. मार्गदर्शक तत्त्वानुसार 1 जूनपासून बँकांना त्याची पुर्तता करावी लागणार आहे.

आरबीआयने वेब पोर्टल सुरू केले:

अलीकडेच RBI ने अनेक बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी वेब पोर्टल सुरु केले आहे. एप्रिल 2023 मध्ये, ठेवीदारांच्या पैशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, आरबीआयने सध्याची हक्क नसलेली ठेव रक्कम त्याच्या हक्काच्या मालकांना परत करण्याबद्दल माहिती दिली होती.

यामुळे RBI ने अलीकडेच अनेक बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी एक वेब पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर राजेश्वर राव यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते की दावा न केलेल्या ठेवींसाठी हे वेब पोर्टल तीन ते चार महिन्यांत तयार होण्याची अपेक्षा आहे.

1 जून 2023 पासून मोहीम सुरू होईल:

यानंतर, 12 मे रोजी RBI ने दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी '100 डेज 100 पे' मोहिमेची घोषणा केली. या अंतर्गत, देशातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेला 100 हक्क नसलेल्या ठेवींची 100 दिवसांतच सेटलमेंट करावी लागेल.

ही मोहीम 1 जून 2023 पासून सुरू करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. RBI वेळोवेळी जागरुकता मोहिमेद्वारे अशा बेकायदेशीर ठेवींवर दावा करण्यासाठी संबंधित बँकांना ओळखण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT