RBI imposes Rs 2.49 crore penalty on 3 banks  Sakal
Personal Finance

RBI: रिझर्व्ह बँकने 3 बँकांना ठोठावला 2.49 कोटींचा दंड; काय आहे कारण?

RBI: भारतीय रिझर्व्ह बँकने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 बँकांना एकूण 2.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये धनलक्ष्मी बँक, पंजाब आणि सिंध बँक आणि ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश आहे.

राहुल शेळके

RBI: भारतीय रिझर्व्ह बँकने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 बँकांना एकूण 2.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये धनलक्ष्मी बँक, पंजाब आणि सिंध बँक आणि ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि सिंध बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका कंपनीला नियमाविरुद्ध कर्ज दिल्याबद्दल आरबीआयने पंजाब आणि सिंध बँकेला दंड ठोठावला.

रिझर्व्ह बँकेने धनलक्ष्मी बँकेला 1.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. KYC, कर्ज आणि व्याजदरांशी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल धनलक्ष्मी बँकेला 1.20 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI ने म्हटले की, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) सह कलम 47A(1)(c) च्या तरतुदींनुसार RBI ला दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेवर 29.55 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. रिझर्व्ह बँकेने ESAF स्मॉल फायनान्स बँकेला RBI नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. RBI ने म्हटले आहे की, या बँकांवरील कारवाई नियमांचे पालन न केल्याबद्दल करण्यात आली आहे.

डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांचा कार्यकाळ वाढवला

दरम्यान केंद्र सरकारने शुक्रवारी, 12 जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला. पात्रा यांचा कार्यकाळ 14 जानेवारीला संपत होता.

अधिकृत अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पात्रा यांची RBI चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून 15 जानेवारीपासून एका वर्षाच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

पात्रा यांची पहिल्यांदा डेप्युटी गव्हर्नर म्हणून जानेवारी 2020 मध्ये 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली होती. पात्रा यांच्याकडे चलनविषयक धोरण विभागाची जबाबदारी आहे. ते चलनविषयक धोरण समितीचे (MPC) सदस्य देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT