RBI Monetary Policy Committee Meeting this week Date, time and what to expect
RBI Monetary Policy Committee Meeting this week Date, time and what to expect Sakal
Personal Finance

RBI MPC Meeting: 5 एप्रिलला होणार व्याजदराबाबत मोठा निर्णय; RBI व्याजदरात बदल करणार का?

राहुल शेळके

RBI Monetary Policy Committee Meeting: आर्थिक वर्ष 2024-25 सुरू झाले आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक या महिन्यात होणार आहे. आरबीआय एमपीसीची 3 ते 5 एप्रिल दरम्यान बैठक होणार आहे. (RBI Monetary Policy Committee Meeting this week Date, time and what to expect)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या आठवड्यात पतधोरणाचा आढावा घेऊन पुन्हा एकदा व्याजदर ठरवणार आहे आणि ते जैसे थे राहण्याची शक्यता जास्त आहे. याचे कारण म्हणजे आर्थिक वाढीची चिंता कमी झाली आहे. आर्थिक वाढ आठ टक्क्यांच्या आसपास राहिल्याने केंद्रीय बँक आता महागाई दर चार टक्क्यांच्या लक्ष्यापर्यंत आणण्यावर अधिक भर देऊ शकते. असे तज्ज्ञांनी सांगितले.

तसेच, RBI ची मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC), जी पॉलिसी रेटवर निर्णय घेते. ही कमिटी अमेरिका आणि ब्रिटन सारख्या काही विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांची भूमिका विचारात घेऊ शकते. पॉलिसी रेटमध्ये कपात करणारी विकसित देशांमधील स्वित्झर्लंड ही पहिली मोठी अर्थव्यवस्था आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानने अनेक वर्षांनंतर नकारात्मक व्याजदराचे धोरण बदलले आहे.

एमपीसीची बैठक 3 एप्रिलपासून सुरू होत आहे

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील एमपीसीची तीन दिवसीय बैठक 3 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 5 एप्रिल रोजी चलनविषयक धोरणाचा आढावा जाहीर केला जाईल. आर्थिक वर्ष 2024-25 साठीची ही पहिलीच पतधोरण आढावा बैठक असेल.

फेब्रुवारी 2023 मध्ये व्याजदरात शेवटची वाढ करण्यात आली होती

आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दर 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, महागाई वाढीचा दर अजूनही पाच टक्क्यांच्या मर्यादेत आहे आणि भविष्यात अन्नधान्याच्या महागाई वाढीच्या आघाडीवर धक्का बसण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेता एमपीसी पॉलिसी दर यथास्थिती ठेवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT