RBI Governor  Sakal
Personal Finance

RBI: RBI ने 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या बातमीवर दिले स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून 500 रुपयांच्या नोटांबाबत आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

राहुल शेळके

RBI Clarification on 500 Rupees Notes: देशातील मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे आणि याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे.

RBI ने काल एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की त्यांच्या सिस्टममधून 88,032.5 कोटी रुपये गहाळ झाल्याची बातमी चुकीची आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याने हा प्रकार घडला आहे.

देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून 500 रुपयांच्या नोटांबाबत आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

काल 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याची बातमी आली:

काल अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे वृत्त आले होते की मनोरंजन रॉय यांनी माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारले होते आणि उत्तरात असे सांगण्यात आले की नवीन डिझाईन असलेल्या 500 रुपयांच्या लाखो नोटा गायब झाल्या आहेत.

त्यांची किंमत 88,032.5 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून 500 रुपयांच्या 8810.65 कोटी नोटा नवीन डिझाईनसह छापल्या.

परंतु रिझर्व्ह बँकेला यापैकी केवळ 726 कोटी नोटा मिळाल्या. एकूण 500 रुपयांच्या 1760.65 कोटी नोटा गायब झाल्या, ज्यांचे मूल्य 88,032.5 कोटी रुपये आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या प्रेस रीलिझमध्ये आणि ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आरबीआयला माहिती मिळाली आहे की अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सिस्टममधून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याची बातमी चुकीची आहे.

प्रिंटिंग प्रेसमधून मिळालेल्या माहितीचा गैरसमज झाला असून, प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्या काही नोटा छापल्या जातात त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या नोटांची छापाई, साठवणूक आणि वितरण यावर संपूर्ण प्रोटोकॉलसह आरबीआयद्वारे देखरेख केली जाते आणि यासाठी एक मोठी यंत्रणा अस्तित्वात आहे.

आरबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश्वर दयाल यांच्या वतीने लिहिले आहे की, अशा कोणत्याही माहितीसाठी सर्वांनी आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरच अवलंबून राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: पणन विभागाचीच माझ्याकडे अर्धी गर्दी - कृषिमंत्री भरणे मामा

SCROLL FOR NEXT