Retail inflation drops to 4-month low of 4.87 per cent in October  Sakal
Personal Finance

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा, किरकोळ महागाई दर 4.87 टक्क्यांवर

Retail Inflation: महागाईचा दर कमी झाला आहे.

राहुल शेळके

Retail Inflation: ऐन सणासुदीच्या काळात महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर कमी झाला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ महागाई दर ऑक्टोबरमध्ये 4.87 टक्क्यांच्या पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.02 टक्के होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत इंधनाचे दर कमी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने एलपीजीच्या किंमतीही कमी केल्या आहेत. खाद्यतेलाच्या किंमती 13.69 टक्क्यांनी घसरल्या असून भाज्यांचे भाव नियंत्रणात राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

महागाई दरातील घसरण ही आरबीआयच्या अपेक्षेनुसार आहे आणि यामुळे आरबीआयला व्याजदर वाढवण्यापासून रोखता येईल. पण कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे महागाई वाढू शकते.

या सोबतच डाळींचे भाव हा चिंतेचा विषय आहे. या महिन्यात डाळींच्या किंमती 18.79 टक्क्यांनी वाढल्या असून मसाल्यांच्या किंमती तब्बल 22.76 टक्क्यांनी वाढल्या आहेत. महिन्याभरात गहू आणि तांदूळ यासह धान्यांमध्ये 10.69 टक्के वाढ झाली आहे.

कांद्याच्या किंंमतीत वाढ

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशात कांद्याची सर्वाधिक किंमत 90 रुपये आणि सर्वात कमी किंमत 20 रुपये प्रति किलो होती. अखिल भारतीय किंमत 60 रुपये प्रति किलो आहे. दिल्लीतील किंमत 60 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे.

अर्थतज्ज्ञांच्या मते अजूनही सावध राहण्याची गरज आहे. यावर्षी मान्सून कमी झाला आहे. ज्यामुळे अन्नधान्याच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो आणि इस्रायल-हमास संघर्षासारख्या भू-राजकीय तणावामुळे तेल बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT