Mukesh Ambani News Sakal
Personal Finance

RIL AGM Meeting: "AI आता सर्वांकडं आणि सगळीकडं"; अंबानींची मोठी घोषणा

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात झेप घेण्याचा मानस अंबानींनी बोलून दाखवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Reliance 46th Annual General Meeting: कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सची (AI) सध्या जगभरात चर्चा आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये अवघं जगच बदलून टाकण्याची क्षमता आहे. भारतातही ते दाखल होत असताना त्याचं मार्केट आपल्या हातात घेण्याचा मानस रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडनं आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला.

यामुळं देशातील प्रत्येक ठिकाणी घराघरात AI पोहोचवणार असल्याची घोषणा यावेळी कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. (RIL AGM Meeting Jio promises AI to everyone everywhere Mukesh Ambani big announcement)

प्रत्येकाकडं आणि सगळीकडं

अंबानी म्हटले की, "रिलायन्स विशेषतः भारतात विकसित करण्यात आलेलं आर्टिफिशिअल इटेलिजन्स तंत्रज्ञान आणि AI पॉवर प्रॉडक्टवर काम करत आहे. 2000 MW AI रेडी कॉम्प्युटिंग कॅपेसिटी तयार करण्याचा कंपनीचा हेतू आहे. AI मुळं जिओ नेटवर्कचं कव्हरेज आणखी वाढणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म आता आपल्या इंडिया स्पेसिफिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मॉडेल्स आणि AI पॉवर्ड सोल्युशन्स अॅक्रोस डोमेन्सवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी AI प्रत्येकाकडं आणि सगळीकडं हे वचन जिओ देत आहे"

भारतानं सर्वात पुढे रहावं

ग्लोबल AI क्रांतीच्या सर्वात पुढे भारतानं राहणं गरजेचं आहे. याच वर्षी आपल्याला हे वादळही पहायला मिळेल. जागाशी स्पर्धा करताना AIच्या संशोधनात, वाढीमध्ये आणि राष्ट्राच्या संपन्नतेसाठी भारतानं यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे, असंही अंबानी म्हणाले.

पायाभूत सुविधांचा अभाव जिओ भरुन काढणार

भारताकडं स्केल आणि डेटा आहे परंतू एआयच्या संगणकीय गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधांचा अभाव आहे. हा अभाव जिओ प्लॅटफॉर्म भरून काढू इच्छितो. या क्षेत्राचा जसजसा विस्तार होत आहे, त्यानुसार आम्ही क्लाउड आणि एज अशा दोन्ही ठिकाणी 2,000 मेगावॅट एआय-रेडी संगणकीय क्षमता निर्माण करणार आहोत. हरित भविष्यासाठी हे करणं गरेजंच असल्याचंही यावेळी अंबानींनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT