sanjay gandhi investment Dynamic Bond Fund Reasonable Return Option money managaement
sanjay gandhi investment Dynamic Bond Fund Reasonable Return Option money managaement sakal
Personal Finance

डायनॅमिक बाँड फंड वाजवी परताव्याचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा

- संजय गांधी

गुंतवणूक ही उद्दिष्ट-केंद्रित, वाढ-केंद्रित, स्थिर कामगिरी करणारी असावी. असा गुंतवणूक पोर्टफोलिओ दीर्घावधीत महागाईला मात देणारा वाजवी परतावा देतो. मात्र हे तेव्हाच शक्य होऊ शकते, जेव्हा गुंतवणूकदारांकडे मालमत्ता वाटपाची सुयोग्य रणनीती असते. रोखे संलग्न अर्थात डेट फंड हे मालमत्ता वाटपाचा एक महत्त्वाचा भाग बनल्यामुळे तुमची गुंतवणूक स्थिर आणि संयत परतावा निर्माण करीत राहते, हे सर्वज्ञात सत्य आहे.

डायनॅमिक बॉंड

आदर्श गुंतवणूक पोर्टफोलिओ साकारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डायनॅमिक बॉंड होय. डायनॅमिक बाँड फंडाचे उद्दिष्ट सक्रिय कालावधीच्या व्यवस्थापनाद्वारे मुख्यतः वेगवेगळ्या कालावधीच्या कॉर्पोरेट आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करून गमावलेल्या मुदतीचा परतावा निर्माण करणे हे आहे.

स्ट्रेचिंग किंवा स्क्विझिंग करून बाजाराच्या परिस्थितीनुसार पोर्टफोलिओ गतिशीलपणे एक ते १० वर्षांच्या श्रेणीतील कालावधीमध्ये कमी-जास्त करण्याचे धोरणच डायनॅमिक बाँड फंडांना डेट योजनांमधील सुयोग्य पर्याय बनवितात.

व्याजदर चक्रावर आधारित गुंतवणूक

डेट साधनांच्या मूल्यांकनासाठी व्याजदराचे चक्र हा सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याने, डायनॅमिक बाँड योजनांना व्याजदरातील अस्थिरतेचा फायदा मिळविता येतो. उदाहरणार्थ, व्याजदर कमी होतील अशी अपेक्षा असल्‍यास, योजनेच्या निधी व्‍यवस्‍थापकाला अधिक परतावा मिळवण्‍यासाठी दीर्घ कालावधीच्‍या बाँडमध्‍ये गुंतवण्‍याचे स्‍वातंत्र्य असते.

याउलट, व्याजदर वाढण्याची अपेक्षा असल्यास, कमी कालावधीच्या बाँडमध्ये गुंतवणूक केली जाते. अशा फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये डेट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स - कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज आणि इतर वेगवेगळ्या कालावधींचा समावेश असू शकतो.

या श्रेणीत रोख्यांचा कालावधी किंवा मुदतपूर्तीचा प्रश्न येतो तेव्हा निधी व्यवस्थापकावर कोणतेही निर्बंध नसतात. डायनॅमिक अॅसेट मॅनेजमेंट यंत्रणेमुळे, किमान तीन वर्षांच्या उद्दीष्टांसह गुंतवणूक केली असल्यास या श्रेणीच्या फंडामध्ये विविध व्याजदर चक्रामध्ये चांगला परतावा देण्याची क्षमता आहे.

डायनॅमिक बाँड फंड योजना असणाऱ्या अनेक फंड कंपन्या आहेत. मात्र या श्रेणीतील सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी एक म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ऑल सीझन्स बाँड फंड. कालावधी ठरवण्यासाठी ही कंपनी इन-हाऊस मॉडेल वापरते, ज्यामुळे फंडाला स्थिर आणि सातत्यपूर्ण परतावा मिळवून देण्यास मदत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT