SIP Investment Sakal
Personal Finance

SIP Investment: दर महिन्याला 1,000 रुपये गुंतवणूक करून बनू शकता करोडपती, जाणून घ्या SIP चा 'हा' जबरदस्त फॉर्म्युला!

Mutual Fund Investment: 1,000 रुपयांची छोटी बचत करून तुम्ही एक नव्हे तर दोन कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता

राहुल शेळके

Mutual Fund Investment: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी रक्कम बाजूला काढून बचत करण्याचा विचार करतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितो जिथून चांगला परतावा मिळेल. तुम्हालाही मोठा परतावा हवा असेल तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल. सूत्रानुसार, तुम्ही दरमहा फक्त 1,000 रुपयांची बचत करूनही करोडपती होण्याचे ध्येय साध्य करू शकता. हे कसे शक्य आहे ते जाणुन घेऊया.

SIP ही गुंतवणुकीची लोकप्रिय पद्धत आहे

करोडपती होण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रथम तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचत करणे आणि दुसरी बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे.

आजच्या काळात, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग म्हणून उदयास आला आहे, ज्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ते फायदेशीर ठरू शकते आणि महिन्याला 1,000 रुपयांची छोटी बचत करून तुम्ही एक नव्हे तर दोन कोटी रुपयांचा निधी उभा करू शकता.

दीर्घकालीन गुंतवणुकीतच फायदा

SIP मधील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वोत्तम फायदा हा आहे की तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढीचा लाभही तुम्हाला मिळतो. गुंतवणुकीचा प्लॅन करणाऱ्या लोकांना लवकरात लवकर किंवा तरुणपणी गुंतवणूक सुरू करण्याचा सल्लाही तज्ञ देतात.

अनेक म्युच्युअल फंडांनी 20% परतावा दिला

आता दरमहा फक्त एक हजार रुपयांची बचत करून करोडपती होण्याचे स्वप्न कसे पूर्ण होऊ शकते याबद्दल बोलूया. यासाठी तुम्हाला तुमच्या बचत केलेल्या रकमेसह म्युच्युअल फंड एसआयपी करावी लागेल.

गेल्या काही वर्षांत एसआयपीद्वारे मिळालेल्या परताव्यावर नजर टाकल्यास, अनेक फंडांनी 20% किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे. त्यानुसार, तुम्ही तुमची गुंतवणूक 30 वर्षे चालू ठेवल्यास, तुमचा जमा झालेला निधी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल.

असे आहे संपूर्ण गणित

जर तुम्ही दरमहा रु. 1,000 ची SIP करत असाल, तर 30 वर्षांच्या कालावधीत तुमच्याद्वारे जमा केलेली रक्कम फक्त 3,60,000 रुपये आहे.

आता यामध्ये तुम्हाला 20% परतावा मिळाला तर तुमचा फंड 2,33,60,000 रुपये होईल. चक्रवाढीचा लाभ मिळाल्याने गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळतो. तरुण वयात गुंतवणूक सुरू करून ती दीर्घकाळ सुरू ठेवल्यास करोडपती होण्याचे ध्येय गाठता येते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

Murlidhar Mohol : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

RRC Recruitment 2025: आनंदाची बातमी! रेल्वेमध्ये 10वी पाससाठी 3115 नवीन भरती जाहीर; सविस्तर माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT