Stock Market Closing Today esakal
Personal Finance

Share Market Closing : शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला घसरण; निफ्टी २४,९५० वर बंद अन् पीएसयू बँक, ऑटो शेअरमध्ये तेजी

Stock Market Closing Today : सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच देशांतर्गत शेअर बाजारांत घसरण झाली आणि दिवसभर बाजारात चढ-उतार दिसून आले. पीएसयू बँक आणि ऑटो शेअरमध्ये तेजी होती

Saisimran Ghashi

Stock Market Closing Update : शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण दिसून आले. आज बाजारात उतार-चढावाचे वातावरण राहिले. दिवसअखेर सेन्सेक्स २७१.१७ अंकांनी घसरून ८२,०५९.४२ वर बंद झाला, तर निफ्टीनेही ७४.३५ अंकांची घसरण घेत २४,९४५.४५ चा टप्पा गाठला.

सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण

  • सेन्सेक्स- २७१.१७ अंकांची घसरण (०.३३%)

  • निफ्टी-७४.३५ अंकांची घसरण (०.३०%)

काही क्षेत्रांत खरेदीचा ओघ

जरी प्रमुख निर्देशांक घसरले असले, तरी काही क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये खरेदीचा ओघ पाहायला मिळाला. विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSU Banks), ऑटोमोबाईल्स, फार्मा आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांत गुंतवणूकदारांनी उत्साहाने खरेदी केली. याउलट IT क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव दिसून आला.

  • Nifty IT इंडेक्स- सुमारे १.५% नी घसरला.

  • PSU बँका आणि ऑटो शेअर्स- चांगली वाढ नोंदवली.

रुपयात थोडी वाढ

अमेरिकेच्या कर्जनिर्धारणात घसरण झाल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये थोडी वाढ झाली.

  • रुपया बंद - ८५.४० प्रति डॉलर

  • डॉलर कमजोर झाल्यामुळे रुपयाला आधार मिळाला, मात्र स्थानिक मागणीमुळे वाढीवर मर्यादा आली.

  • याशिवाय मे महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी २.२ अब्ज डॉलर्सची खरेदी भारतीय शेअर बाजारात केली आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम रुपये आणि बाजार दोघांवरही झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT