sunil chhetri net worth asserts properties salary car collection brands endorsement football  Sakal
Personal Finance

Sunil Chhetri Net Worth: ऑडी, फॉर्च्युनर सारख्या कारचा मालक, बेंगळुरूमध्ये आलिशान घर; फुटबॉलपटू सुनील छेत्रीची संपत्ती किती?

Sunil Chhetri Net Worth: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. छेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.

राहुल शेळके

Sunil Chhetri Net Worth: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. छेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. सुनील छेत्री हा भारतातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आहे. त्याचबरोबर तो देशातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंपैकी एक आहे.

सुनील छेत्री एका वर्षात किती कमावतो?

2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार सुनील छेत्रीची एकूण संपत्ती 8.5 कोटी रुपये आहे. त्याचा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि आयएसएल संघाचा बेंगळुरू एफसीशी करार आहे. फुटबॉल खेळून तो एका वर्षात 80 लाख ते 1 कोटी रुपये कमावतो.

छेत्रीने FSCG खेळाडू पिंटोला, क्रेड फायर बोल्ट आणि स्पोर्ट्स कंटेंट प्लॅटफॉर्म UV स्पोर्ट्स यांची जाहिरात केली आहे. 2019 मध्ये, त्याने स्पोर्ट्सवेअर ब्रँड Puma सोबत तीन वर्षांचा करार केला.

सुनील छेत्रीचे कार कलेक्शन

रिपोर्ट्सनुसार, छेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये अनेक मोठी वाहने आहेत. छेत्रीकडे Audi A6, Toyota Fortuner, Kia Seltos आणि Mahindra Scorpio या गाड्या आहेत. छेत्रीचे बेंगळुरूमध्येही आलिशान घर आहे. हे घर 7000 स्क्वेअर फूटमध्ये असून त्याची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे.

सुनील छेत्री शेवटचा सामना कुवेतविरुद्ध खेळणार

छेत्रीचा शेवटचा सामना कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर कुवेतविरुद्ध होणार आहे. हा विश्वचषक पात्रता सामना आहे. सुनीलच्या कारकिर्दीत कोलकाताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ त्यांनी येथे घालवला.

39 वर्षीय छेत्री 19 वर्षांपासून भारतीय फुटबॉलमध्ये आहे. 2005 मध्ये त्याने टीम इंडियासाठी पहिला सामना खेळला होता. त्याने भारतासाठी 150 सामन्यांमध्ये 94 गोल केले आहेत. भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT