Tamil Nadu Private bank held a woman hostage after her husband failed to pay loan installment of Rs 770 Sakal
Personal Finance

Bank Loan: पतीने कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून पत्नीला ठेवलं ओलीस; खासगी बँकेतील संतापजनक प्रकार!

Bank Loan: तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात एका खाजगी बँकेच्या शाखेने बुधवारी एका महिलेला पतीने कर्जाचा हप्ता जमा न केल्यामुळे ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने 770 रुपयांचा कर्जाचा हप्ता भरल्यानंतर अखेर महिलेची सुटका करण्यात आली.

राहुल शेळके

Bank Loan: तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात एका खाजगी बँकेच्या शाखेने बुधवारी एका महिलेला पतीने कर्जाचा हप्ता जमा न केल्यामुळे ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने 770 रुपयांचा कर्जाचा हप्ता भरल्यानंतर अखेर महिलेची सुटका करण्यात आली.

शाखेतील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सेल्वम (नाव बदलले आहे) दैनंदिन मजुरी करणारा असून तो सालेम जिल्ह्यातील असून त्याला 770 रुपयांच्या साप्ताहिक हप्त्याने 35,000 रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.

या प्रकरणात, त्याने या आठवड्याचा हप्ता भरला नाही. बँक कर्मचारी हप्त्याची रक्कम घेण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी तो घरी नसल्यामुळे पत्नीला बँकेत नेऊन कोंडून ठेवले. त्यानंतर बँक कर्मचाऱ्याने पत्नीच्या माध्यमातून तिच्या पतीशी संपर्क साधून त्याची पत्नी बँकेच्या शाखेत असल्याची माहिती दिली आणि बँकेच्या कर्मचाऱ्याने या आठवड्याचा हप्ता भरून पत्नीला घरी घेऊन जाऊ शकतो असे सांगितले.

यानंतर, त्याने बँकेत धाव घेतली आणि बँकेने त्यांना स्पष्टपणे सांगितले की ते हप्ता भरल्याशिवाय पत्नीला घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यानंतर, त्याने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली, एका पोलिसाच्या उपस्थितीत 770 रुपये हप्त्याची रक्कम बँकेत भरली आणि पत्नीला घरी नेले.

खासगी बँकेच्या अशा संतापजनक कृत्याचा ग्राहकांनी तीव्र निषेध केला असून या घटनेमुळे शाखेच्या कारभारावर आणि वित्तीय संस्थांमधील कर्जदारांना मिळणाऱ्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro News: मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! 'या' दोन लाईनवरील रेल्वे सेवेच्या वेळेत बदल; कधी आणि का? जाणून घ्या...

विराट कोहली - रिषभ पंत BCCI चा नियम पाळणार! वनडे स्पर्धा खेळणासाठी संभावित संघात निवड

Mundhwa Land case: शीतल तेजवाणीचं आणखी घर आणि कार्यालय असण्याची शक्यता; पोलिसांच्या हाती काय लागलं?

Pune Protest : लोकमान्यनगर पुनर्विकासातील अनिश्चिततेविरोधात नागरिकांचा संताप उसळला; “हक्काचं घर” वाचवण्यासाठी जोरदार आंदोलन!

Maharashtra GST Strike : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतरही जीएसटी अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT