Tata Motors Top 10 Auto Manufacturers Sakal
Personal Finance

Tata Motors: टाटा मोटर्सने रचला इतिहास; आता टेस्लाला देणार टक्कर? कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

Tata Motors included in the list of top 10 car (Auto) manufacturing companies: जगातील टॉप 10 कार उत्पादक कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्सचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत स्थान मिळवणारी टाटा मोटर्स ही पहिली भारतीय कंपनी आहे. 3 दिवसांपूर्वी टाटा मोटर्स 12 व्या क्रमांकावर होती.

राहुल शेळके

Top 10 Auto Manufacturers: एकीकडे जगातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या समस्यांचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे देशांतर्गत कंपनी टाटा मोटर्स यशाच्या पायऱ्या चढत आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीला मागे टाकणाऱ्या टाटा मोटर्सने आता पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

जगातील टॉप 10 कार उत्पादक कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्सचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत स्थान मिळवणारी टाटा मोटर्स ही पहिली भारतीय कंपनी आहे. 3 दिवसांपूर्वी टाटा मोटर्स 12 व्या क्रमांकावर होती.

टाटा मोटर्सचे शेअर्स यावर्षी 48 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत आणि गेल्या वर्षी ते 101 टक्क्यांहून अधिक वाढले होते. टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 4.27 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत.

मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ

Tata Motors चे मार्केट कॅप 3 दिवसात 48 अब्ज डॉलर वरून 51 अब्ज डॉलर झाले आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप आता अमेरिकेच्या जनरल मोटर्स आणि नेदरलँड्सच्या स्टेलांटिसपेक्षा जास्त आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये यावर्षी सातत्याने वाढ होत आहे.

कंपनीने 2024 मध्ये गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, टेस्ला, पोर्श, बीएमडब्ल्यू आणि स्टेलांटिस यांसारख्या बड्या कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत.

जगातील टॉप 10 ऑटो कंपन्या कोणत्या?

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टेस्ला अजूनही 711.2 अब्ज डॉलर मार्केट कॅपसह टॉप 10 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर टोयोटा मोटर्स 309 अब्ज डॉलर, BYD कंपनी 92.6 अब्ज डॉलर, फेरारी 74.02 अब्ज डॉलर, मर्सिडीज-बेंझ 71.2 अब्ज डॉलर, पोर्श 68.2 अब्ज डॉलर, BMW 59.5 अब्ज डॉलर, Volkswagen 58.2 अब्ज डॉलर, होंडा मोटर कंपनी 56.4 अब्ज डॉलर, त्यानंतर टाटा मोटर्स 50.64 अब्ज डॉलर मार्केट कॅपसह या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT