Timberland India Sakal
Personal Finance

Timberland: ईशा अंबानींची मोठी डील; टिंबरलँडचे भारतात पुनरागमन, कोणत्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येणार?

Timberland India: मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांनी एक मोठी डील केली आहे. ईशा अंबानीच्या डीलमुळे लेदर शू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वुडलँडला आता भारतात जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

राहुल शेळके

Timberland India: मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांनी एक मोठी डील केली आहे. ईशा अंबानीच्या डीलमुळे लेदर शू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वुडलँडला आता भारतात जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे. भारतातील लेदर शूजच्या शौकीन लोकांना वुडलँड व्यतिरिक्त इतर मोठ्या ब्रँडचे पर्याय देखील मिळणार आहेत.

अमेरिकन फुटवेअर ब्रँड टिंबरलँड पुन्हा एकदा भारतात परतला आहे. ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलच्या मदतीने टिंबरलँडने भारतात पुनरागमन केले आहे. टिम्बरलँड उत्पादने भारतात ऑनलाइन फॅशन प्लॅटफॉर्म AJIO वर उपलब्ध असतील.

यापूर्वी, स्थानिक बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा आणि स्थानिक ब्रँड वुडलँडसोबतच्या कायदेशीर वादामुळे टिंबरलँडला 2015 मध्ये भारतातील किरकोळ दुकाने बंद करावी लागली होती. टिंबरलँड बौद्धिक संपत्तीच्या कायदेशीर वादात अडकली होती. याचे कारण दोघांच्या लोगो आणि उत्पादनांमध्ये साम्य होते.

वुडलँड भारतात कधीपासून आहे?

वुडलँडची मूळ कंपनी, एरो ग्रुप 50 च्या दशकापासून या उद्योगात आहे. कॅनडामध्ये स्थापन झाल्यानंतर वुडलँडने 1992 मध्ये भारतात प्रवेश केला. त्याआधी एरो ग्रुप आपल्या लेदर शूजची रशियाला निर्यात करत असे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, ते अजिओ, एच अँड एम, टिंबरलँड सारख्या काही नवीन ब्रँड्द्वारे आपला पोर्टफोलिओ मजबूत करत आहे. रिलायन्स रिटेलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स ब्रँडचा टिंबरलँडसोबत 2009 मध्ये वितरण आणि परवाना करार झाला होता. गेल्या महिन्यात, रिलायन्स रिटेलने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर स्वीडिश फॅशन कंपनी H&M ची उत्पादने लॉन्च करण्याची घोषणा केली होती.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने सोमवारी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 1.3 टक्क्यांनी वाढून 2,836 कोटी रुपये झाला आहे. जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 2,800 कोटी रुपये होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात तब्बल 'इतक्या' रूपयांची वाढ, चांदी मात्र ५००० रुपयांनी घसरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

बापरे श्रद्धा कपूरला काय झालं! ‘ईठा’च्या चित्रीकरणात दुखापत; लावणी सीक्वेन्सदरम्यान पायाला फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update: : लोखंडवाला परिसरात रेंज रोव्हर कारचा अपघात

Pune News : ऊसाच्या वजन चोरीवर साखर आयुक्तांचा कडक पवित्रा! 'भरारी पथके' कार्यान्वित, वजनकाटा तपासणीत आयटी तज्ज्ञ होणार सहभागी

Pune Accident: मी पोलिसाचा मुलगा, पार्टी करून आलेल्या तरुणांचा नारायण पेठेत धिंगाणा, अपंग व्यक्तीला धडक! रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT