Toll tax likely to be increased from next month, travelling on NHs and Expressway to get expensive
Toll tax likely to be increased from next month, travelling on NHs and Expressway to get expensive Sakal
Personal Finance

Toll Tax Rate : वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

सकाळ डिजिटल टीम

Toll Tax Rate : राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील.

कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले ​​जाण्याची शक्यता आहे. हिंदी दैनिक हिंदुस्तानने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, टोलचे दर 5% ते 10% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स धोरण :

राष्ट्रीय महामार्ग शुल्क (Determination of Rates and Collection) नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. विशिष्ट टोल मुद्द्यांवर वेळोवेळी आवश्यकतेनुसार धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत.

रस्ते वाहतूक मंत्रालय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रस्तावांवर विचार करेल आणि योग्य विचार केल्यानंतर दरांना मंजुरी देऊ शकेल. अहवालात पुढे म्हटले आहे की कार आणि हलक्या वाहनांसाठी टोलचे दर पाच टक्क्यांनी आणि इतर अवजड वाहनांसाठी 10 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरही टोलचे दर वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या नव्याने सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या सेक्शनवर ₹2.19 प्रति किलोमीटर टोल आकारला जात आहे, ज्यामध्ये सुमारे 10 टक्क्यांनी वाढ केली जाईल.

द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या एक्स्प्रेस वेवर दररोज सुमारे 20 हजार वाहने ये-जा करत असून, येत्या सहा महिन्यांत त्यांची संख्या 50 ते 60 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. (Toll tax likely to be increased from next month, travelling on NHs and Expressway to get expensive)

दुसरीकडे, ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे आणि दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेचे टोल दरही वाढण्याची शक्यता आहे. साधारणतः स्वस्त असलेल्या टोल प्लाझाच्या 20 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या लोकांना मासिक पासची सुविधाही 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT