Trump's Net Worth Hits 6.5 Billion Dollar Becomes One Of World's Richest People Sakal
Personal Finance

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश; किती आहे संपत्ती?

Donald Trump Net Worth: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत चार अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यासह, ट्रम्प ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील 500 श्रीमंत लोकांच्या यादीत सामील झाले आहेत.

राहुल शेळके

Donald Trump Net Worth: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत चार अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यासह, ट्रम्प ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील 500 श्रीमंत लोकांच्या यादीत ट्रम्प सामील झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती यापूर्वी 3.1 अब्ज रुपयांच्या शिखरावर होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट मालमत्तांचा समावेश आहे. 2015 पासून ब्लूमबर्गने ट्रम्प यांच्या निव्वळ संपत्तीचे मूल्यांकन केले आहे. अलीकडील अहवालात ट्रम्प यांची संपत्ती जो रिकेट्स, गॉर्डन गेटी आणि टोनी जेम्स यांच्या बरोबरीची झाली आहे. (Donald Trump is one of world's 500 richest people)

सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती 4 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये ट्रम्प पहिल्यांदाच जगातील सर्वात श्रीमंत 500 लोकांच्या यादीत 6.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सामील झाले आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. (Trump's Net Worth Hits $6.5 Billion, Making Him One of World's 500 Richest People)

फसवणूक प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा

न्यूयॉर्क फसवणूक प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना 25 मार्चपर्यंत सुमारे 454 दशलक्ष डॉलर भरावे लागतील असा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यांनी तसे केले नसते तर त्यांची मालमत्ता जप्त झाली असती परंतु न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दिलासा दिला. ही रक्कम तात्काळ थांबवावी, अशी विनंती ट्रम्प यांनी न्यायालयाला केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.

गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांना हा दंड ठोठावण्यात आला होता. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फसवणूक प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशांनी हा दंड ठोठावला होता. स्वत:ला श्रीमंत दाखवून ट्रम्प बँकांकडून कर्ज मिळवत होते. त्यासाठी ते बँकांना बनावट आर्थिक तपशील दाखवायचे.

सध्या, ट्रम्प यांना सहा महिन्यांसाठी त्यांचे DWAC कंपनीचे शेअर्स विकण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्थितीत कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यास ट्रम्प यांच्या मालमत्तेवर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT