UBS Credit Suisse Merger Sakal
Personal Finance

Banking Crisis : युबीएस -क्रेडिट सुईसच्या विलीनीकरणामुळे 36,000 कर्मचाऱ्यांना मिळू शकतो नारळ

बँकिंग परिस्थिती सुधारली नाही तर सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक सारख्या संकटात अमेरिकेतील सुमारे 110 बँका अडकू शकतात.

राहुल शेळके

UBS Credit Suisse Merger: बँकिंग क्षेत्रातील आलेल्या संकटामुळे स्वित्झर्लंडची सर्वात मोठी बँक UBS आणि Credit Suisse यांचे विलीन होणार आहेत. दरम्यान, या विलीनीकरणामुळे जगभरातील 36,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

SonntagsZeitung च्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. 19 मार्च रोजी UBS ने क्रेडिट सुइस ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली होती. यूबीएसने बुधवारी जाहीर केले की ते स्विस बँक क्रेडिट सुईसमधील बँकिंग संकट हाताळण्यासाठी माजी मुख्य कार्यकारी सर्जिओ एर्मोटीला परत आणतील. (UBS Credit Suisse Merger may lead to 36,000 job cuts says Reports)

20-30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाऊ शकते

अहवालानुसार, कंपनी 20 ते 30 टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढू शकते. याचा अर्थ 25,000 ते 36,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

अहवालानुसार, यामुळे एकट्या स्वित्झर्लंडमध्ये 11,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. मात्र, या अंतर्गत कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात होणार याचा उल्लेख अहवालात करण्यात आलेला नाही.

विलीनीकरणापूर्वी, UBS चे 72,000 पेक्षा जास्त कर्मचारी होते आणि Credit Suisse चे 50,000 पेक्षा जास्त कर्मचारी होते. UBS आणि क्रेडिट स्विस या स्वित्झर्लंडमधील सर्वात महत्त्वाच्या बँकांपैकी एक आहेत.

या बँकांना ग्लोबल सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन (G-SIFI) या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ या बँका जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या बुडू देता येणार नाहीत.

बँकिंग परिस्थिती सुधारली नाही तर सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक सारख्या संकटात अमेरिकेतील सुमारे 110 बँका अडकू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बँकिंग संकट सोडवण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बँकांना 250 अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT