मार्च तिमाही आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफा आणि महसूल वाढल्यामुळे शेअर्सची खरेदी वाढली esakal
Personal Finance

Vijaya Diagnostic : विजया डायग्नोस्टिक सेंटरच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, टारगेट प्राइसमध्ये वाढ

Target Price Increased : मार्च तिमाही आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफा आणि महसूल वाढल्यामुळे शेअर्सची खरेदी वाढली

सकाळ डिजिटल टीम

Share Market News : विजया डायग्नोस्टिक सेंटरचे (Vijaya Diagnostic Centre) शेअर्स 10 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी वाढले आणि नवीन उच्चांक गाठले. मार्च तिमाही आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफा आणि महसूल वाढल्यामुळे शेअर्सची खरेदी वाढली आहे. ब्रोकरेज कंपनीच्या आर्थिक निकालांवर खूश आहेत आणि त्यांनी त्यांचे रेटिंग आणि टारगेट प्राइस वाढवल्या आहेत. त्यामुळे खरेदीलाही चालना मिळाली आहे.

शुक्रवारी सकाळी बीएसईवर हा शेअर 734.75 रुपयांवर तेजीसह उघडला. दिवसभरात तो मागील बंद किमतीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढून 799 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. स्टॉकसाठी हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कंपनीचे मार्केट कॅप 8100 कोटीवर पोहोचले आहे. मार्च 2024 अखेरपर्यंत, प्रमोटर्सकडे कंपनीत 54.06 टक्के आणि पब्लिक शेयरहोल्डर्सकडे 45.94 टक्के हिस्सा होता.

मार्च 2024 तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल वार्षिक 28.3 टक्क्यांनी वाढून 155.21 कोटी झाला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत ते 120.99 कोटी होते. एकत्रित निव्वळ नफा वर्षभरात 21.7 टक्क्यांनी वाढून 33.45 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी 27.49 कोटी होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये विजया डायग्नोस्टिक्सच्या ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल, वार्षिक आधारावर 19.3 टक्क्यांनी वाढून 547.81 कोटी झाले. एका वर्षापूर्वी ते 459.22 कोटी होते. तर निव्वळ नफा 40.4 टक्क्यांनी वाढून 118.83 कोटी झाला आहे जो मागील वर्षी 84.63 कोटी होता.

तिमाही निकाल, विस्तार योजना आणि चांगले मार्जिन लक्षात घेता, ब्रोकरेजला विजया डायग्नोस्टिकच्या स्टॉकमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने शेअर्सवर 'बाय' रेटिंग कायम ठेवत टारगेट 20 टक्क्यांहून अधिक वाढवून 910 रुपये प्रति शेअर केली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT