Who Is Renuka Jagtiani, Forbe's Billionaire List 2024 know her success story and net worth  Sakal
Personal Finance

Renuka Jagtiani: कोण आहेत रेणुका जगतियानी? सर्वात श्रीमंतांच्या यादीत एन्ट्री; पती लंडनमध्ये चालवायचे कॅब

Renuka Jagtiani Net Worth: भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर झाली आहे. यावर्षी फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 25 नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. लँडमार्क ग्रुपच्या सीईओ रेणुका जगतियानी यांचाही या नव्या नावांमध्ये समावेश आहे.

राहुल शेळके

Forbe's Billionaire List 2024: भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर झाली आहे. यावर्षी फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 25 नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. लँडमार्क ग्रुपच्या सीईओ रेणुका जगतियानी यांचाही या नव्या नावांमध्ये समावेश आहे. जाणून घ्या कोण आहेत रेणुका जगतियानी?

रेणुका या 71 वर्षांच्या आहेत. त्या देशातील 100 श्रीमंत लोकांच्या यादीत 44 व्या स्थानावर आहे. दुबईस्थित लँडमार्क ग्रुपला पुढे नेण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. रेणुका यांची एकूण संपत्ती 40,006 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. पती मिकी जगतियानी यांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण समूहाची जबाबदारी सांभाळली आहे.

लँडमार्क ग्रुपची स्थापना रेणुका यांचे पती मिकी जगतियानी यांनी 1973 मध्ये केली होती. मिकी एकेकाळी लंडनमध्ये टॅक्सी चालवत असे. भाऊ आणि आई-वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर मिकीला लंडन सोडून बहारीनला जावे लागले.

तेथे त्यांनी भावाचे खेळण्यांचे दुकान घेतले. एका दुकानाचे दहा दुकानात रूपांतर केले. नंतर बहारीनमधून ते दुबईला गेले. तिथे लँडमार्क ग्रुपचा पाया मिकी यांनी घातला.

रेणुका लँडमार्क ग्रुप कधीपासून सांभाळत आहे?

रेणुका जगतियानी 1993 पासून लँडमार्क ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात लँडमार्क ग्रुप हा प्रदेशातील होम ब्रँडचा सर्वात मोठा ब्रँड बनला.

लँडमार्क ग्रुपचा व्यवसाय भारतासह 21 देशांमध्ये पसरलेला आहे. समूह कंपन्यांची 2,200 दुकाने असून त्यात 50 हजार लोक काम करतात. पतीच्या निधनानंतरही रेणुका यांनी आपला व्यवसाय वाढवला. आरती, निशा आणि राहुल ही त्यांची मुले आहेत.

तिन्ही मुले लँडमार्क ग्रुपचे संचालक आहेत. 1999 मध्ये त्यांनी लँडमार्क ग्रुपचा भारतीय व्यवसाय सुरू केला आणि आता कंपनीची देशात 900 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. यासोबतच लँडमार्क ग्रुपचा हॉटेल व्यवसायही वेगाने प्रगती करत असून रेणुका यांच्या संपत्तीतही त्याच वेगाने वाढ होत आहे.

फोर्ब्स 2024 च्या श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेल्या रेणुका जगतियानी यांनी लँडमार्क ग्रुपला पुढे नेण्यात आणि त्याला मोठ्या उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

व्यवसाय क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत रेणुका यांना 2007 मध्ये उत्कृष्ट एशियन बिझनेस वुमन ऑफ द इयर आणि 2012 मध्ये बिझनेसवुमन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

Uruli Kanchan Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाचा उद्रेक; बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी; उरुळी कांचन घटना!

SCROLL FOR NEXT