Who is Sanjiv Goenka LSG Owner whose was seen scolding KL Rahul in IPL Match viral video Sakal
Personal Finance

Who is Sanjiv Goenka: केएल राहुलला झापणारे, धोनीला कर्णधारपदावरून हटवणारे; कोण आहेत संजीव गोयंका?

Who is Sanjiv Goenka: काल रात्री (8 मे 2024) लखनौ सुपरजायंट्स (LSG)च्या पराभवामुळे संजीव गोयंका हे नाव चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे गोयंकाने लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलला मैदानावरच झापले सोशल मीडिया साइट X (ट्विटर) वर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राहुल शेळके

Who is Sanjiv Goenka: काल रात्री (8 मे 2024) लखनौ सुपरजायंट्स (LSG)च्या पराभवामुळे संजीव गोयंका हे नाव चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे गोयंकाने लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलला मैदानावरच झापले सोशल मीडिया साइट X (ट्विटर) वर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये संजीव गोएंका केएल राहुलशी रागाने बोलताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते संजीव गोयंका यांच्यावर जोरदार टीका करत आहेत आणि ते केएल राहुलची बाजू घेत असल्याचे दिसत आहे. पण तुम्हाला माहित आहे का संजीव गोएंका कोण आहेत?

कोण आहेत संजीव गोयंका?

संजीव गोएंका हे RPSG (RP-Sanjiv Goenka Group) समूहाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कंपनीत 50 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. कंपनी कार्बन ब्लॅक, पॉवर, आयटी, रिटेल उत्पादने, मीडिया, क्रीडा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये जगभरात व्यवसाय करते. याशिवाय त्यांनी IIT खरगपूरचे बोर्ड सदस्य म्हणूनही काम केले आहे.

संजीव गोयंका हे मूळचे कोलकाता येथील असून त्यांनी 1981 मध्ये सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.कॉमची पदवी प्राप्त केली होती. त्यांची पत्नी प्रीती इंटेरिअर डिझायनर आहे. दोघांना शाश्वत आणि अवर्णा ही दोन मुले आहेत. त्यांचा भाऊ हर्ष गोयंका हा बिझनेसमन आहे.

देशातील टॉप बिझनेसमनमध्ये गणले जाणारे संजीव गोयंका यांचा दिल्लीतील सर्वात महागड्या लुटियन्समध्ये बंगला आहे. राजधानी दिल्लीतील सर्वात महागड्या घरांमध्ये याची गणना केली जाते. संजीव गोएंका यांचा कोलकातामध्ये आलिशान बंगलाही आहे. हा बंगला त्यांचे आजोबा बद्रीदास गोएंका यांनी बांधला होता. दक्षिण कोलकाता येथील अलीपूरजवळ एक एकर परिसरात हा बंगला आहे.

2021 मध्ये, संजीव गोयंका आयपीएलच्या लखनौ फ्रँचायझीमुळे प्रसिद्धीझोतात आले. लखनौ संघ विकत घेण्यात रस दाखवणाऱ्या गौतम अदानी यांचा त्यांनी बोलीत पराभव केला होता. आणि 7000 कोटींची बोली लावली होती. तर अदानींकडून 5,100 कोटींची बोली लावण्यात आली होती.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संजीव गोयंका यांनी लखनौ संघ विकत घेण्यासाठी खर्च केलेला पैसा मुकेश अंबानींनी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीसाठी खर्च केलेल्या पैशापेक्षा 9 पट जास्त होता. फोर्ब्सच्या मते, संजीव गोएंका यांची एकूण संपत्ती 3.4 अब्ज डॉलर आहे. ते देशातील 84 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 949व्या क्रमांकावर आहे.

संजीव गोएंका यांनी धोनीला कर्णधारपदावरून हटवले

रायझिंग पुणे सुपरजायंट्सची मालकी संजीव गोयंका यांच्या आरपी-संजीव गोएंका गटाकडे होती. 18 जानेवारी 2016 रोजी कोलकाता येथे त्यांनी संघाच्या नावाची घोषणा केली आणि रघु अय्यर यांना सीईओ बनवले. महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार झाला.

संघ मालकांनी 19 फेब्रुवारी 2017 रोजी अचानक धोनीला कर्णधारपदावरून हटवले. आणि मग 26 मार्च 2017 रोजी, संघाचे नाव बदलले आणि ते रायझिंग पुणे सुपरजायंट्स झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूस्खलनात अख्खं गाव गाडलं गेलं, किमान १ हजार जणांचा मृत्यू, एकटाच वाचला; वेस्टर्न सुदानमधील घटना

Maratha Reservation: 'मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ अडचणीचे'; दोन प्रकरणांत सर्वोच्च, उच्च न्यायालयाची नकारघंटा

Nestle CEO: ऑफिसमध्ये CEOचे ज्युनियर सोबत अफेअर; मोजावी लागली मोठी किंमत, 913 कोटींची नोकरी गमावली

Mitchell Starc Retirement: मिचेल स्टार्कने अचानक जाहीर केली निवृत्ती; म्हणाला, कसोटी अन् वन डे क्रिकेट...

Latest Marathi News Updates : कर्नाटकात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT