YouTube CEO Sakal
Personal Finance

YouTube CEO : पहिली सॅलरी 2 लाख, बोनस चक्क 544 कोटी, पहा युट्यूबच्या CEO चा गुगलमधला प्रवास

भारतीय वंशाचे नील मोहन हे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube चे नवे सीईओ झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

YouTube CEO Neal Mohan : भारतीय वंशाचे नील मोहन हे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube चे नवे सीईओ झाले आहेत. नील मोहन हे सुसान वोजिकी यांची जागा घेतील. सुसान वोजिकी या नऊ वर्षांनंतर आपल्या पदावरून पायउतार होत आहेत.

त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. नील मोहन सध्या YouTube चे मुख्य प्रोडक्ट अधिकारी आहेत. ते सुसान वोजिकीचे दीर्घकाळ सहयोगी आहेत.

नील मोहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत, जे जगातील आघाडीच्या कंपन्या हाताळत आहेत. उदाहरणार्थ, Microsoft CEO सत्या नडेला, Adobe CEO शंतनू नारायण आणि Alphabet CEO सुंदर पिचाई यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे.

YouTube चे नवीन सीईओ नील मोहन हे त्यांची पत्नी हेमा सरीमसोबत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात. नील मोहनने ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वार्षिक उत्पन्न 60,000 डॉलर होते. ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टनंतर, त्यांनी DoubleClick कंपनीमध्ये काम केले.

नील मोहन यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, यूएसए मधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. 2005 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केले.

नील मोहन 2015 मध्ये YouTube मध्ये मुख्य प्रोडक्ट अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. YouTube वर मुख्य प्रोडक्ट अधिकारी म्हणून त्यांनी शॉर्ट्स, संगीत आणि सब्सक्रिप्शनवर लक्ष केंद्रित केले.

नील मोहन यांना ट्विटरवरून नोकरीची ऑफर देखील आली होती. गुगलला याची माहिती मिळताच गुगलने त्यांना रोखण्यासाठी बोनस जाहीर केला. बोनस देऊन गुगलने त्यांना तीन वर्षांसाठी रोखले होते. गुगलने त्यांना 544 कोटी रुपयांचा बोनस दिला होता.

यूट्यूब व्यतिरिक्त, ते कपडे आणि फॅशन कंपनी स्टिच फिक्सचे बोर्ड डायरेक्टर म्हणून देखील काम करतात. नील 23 अँड मी बायोटेक्नॉलॉजी रिसर्च कंपनीच्या संचालक मंडळावर देखील आहे.

नील मोहन यांनी YouTube चे सीईओ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले, 'धन्यवाद सुसान वोजिकी, गेली अनेक वर्षे तुमच्यासोबत काम करणे खूप छान आहे.

तुम्ही YouTube हे निर्मात्यांसाठी आणि दर्शकांसाठी एक विलक्षण घर बनवले आहे. हे महत्त्वाचे मिशन सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे.''

YouTube ला फायदेशीर बनवणे हे नील यांचे पहिले लक्ष्य आहे. या वर्षी गुगलला अंदाजे सात अब्ज डॉलर्स कमावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सुसान वोजिकी यांनी राजीनामा का दिला?

TikTok आणि Facebook च्या Reels सारख्या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ सेवा आणि Netflix सारख्या स्ट्रीमिंग सेवांमधून होणाऱ्या स्पर्धेमुळे YouTube च्या जाहिरातींच्या कमाईत सलग दुसऱ्या तिमाहीत घट झाली. त्यामुळेच सुसानने राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

त्या म्हणाल्या की, ''मी आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. कुटुंब, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांबाबत नवीन काम सुरू करणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT