Zoom President Greg Tomb Fires  Sakal
Personal Finance

Zoom President : झुम कंपनीचा कर्मचाऱ्यांनंतर आता थेट अध्यक्षांनाच दणका, पदावरुन केली हकालपट्टी

अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Zoom President Fires : व्हिडिओ कम्युनिकेशन कंपनी झूमचे सीईओ एरिक युआन यांनी कंपनीच्या 1,300 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. आणि आता, कंपनीचे अध्यक्ष, ग्रेग टॉम्ब यांना अचानक काढून टाकल्यानंतर कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नियामक फाइलिंगमध्ये, झूमचे अध्यक्ष ग्रेग टॉम्ब यांची 'कोणत्याही कारणाशिवाय' नोकरीवरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. (Zoom abruptly fires its president, Greg Tomb, after just 10 months)

कारण कंपनीने जून 2022 मध्ये उच्चस्तरीय एक्झिक्युटिव्हची नियुक्ती केली होती. याचा अर्थ कंपनीमध्ये एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांना काढून टाकण्यात आले आहे.

झूमने अध्यक्ष ग्रेग टॉम्ब यांना धक्का :

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने जाहीर केले की, आतापर्यंत ते टॉम्ब यांची जागा भरण्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याला शोधत नाहीत. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यामागचे कारण मात्र कंपनीने सांगितले नाही.

टॉम्ब ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी म्हणून झूममध्ये सामील झाले आणि फक्त आठ महिन्यांनंतर त्यांची अध्यक्षपदी पदोन्नती झाली.

Zoom कंपनीमध्ये नियुक्त होण्यापूर्वी, टॉम्ब मे 2021 पासून Google मध्ये विक्री अधिकारी, Google Workspace, सुरक्षा आणि जिओ एंटरप्राइझचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते

झूमने 1,300 कर्मचाऱ्यांची कपात केली होती :

गेल्या महिन्यात झूमचे सीईओ एरिक युआन यांनी घोषणा केली होती की झूम आपल्या 15 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे. याचा परिणाम सुमारे 1,300 लोकांवर झाला.

या व्यतिरिक्त, युआनने यांनी असेही जाहीर केले की ते येत्या आर्थिक वर्षासाठी पगारात 98 टक्क्यांनी कपात करणार आहे आणि यावेळी वार्षिक कॉर्पोरेट बोनस देखील दिला जाणार नाही.

कर्मचार्‍यांना ईमेलमध्ये सीईओने लिहिले, "झूमचे सीईओ आणि संस्थापक या नात्याने, मी या चुका आणि आज केलेल्या कृतींसाठी जबाबदार आहे. त्यासाठी मी येत्या आर्थिक वर्षासाठी माझा पगार 98 टक्क्यांनी कमी करत आहे.

माझ्या कार्यकारी नेतृत्व टीमचे सदस्य येत्या आर्थिक वर्षासाठी त्यांचे मूळ वेतन 20 टक्क्यांनी कमी करतील आणि त्यांना FY23 कॉर्पोरेट बोनस देखील मिळणार नाही."

अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात :

अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. अलीकडेच Yahoo कंपनीने 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. डेलने आपल्या सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT