Adani Group Sakal
Share Market

Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का; 'ही' कंपनी अदानी ग्रुपमधील हिस्सेदारी विकणार, काय आहे प्रकरण?

Adani Group: कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

राहुल शेळके

Adani Group: एका अहवालामुळे अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये आज जोरदार घसरण झाली. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, अबू धाबीची इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (IHC) या दोन कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी करत आहे. असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 1.66 टक्क्यांनी घसरून रु. 816.40 वर आहेत आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 1.01 टक्के घसरणीसह रु. 1001.55 वर आहेत.

गुरुवारी माहिती देताना, UAE मधील अबू धाबी ग्रुप इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (IHC) ने सांगितले की ते भारताच्या अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी पूर्णपणे विकत आहे. गौतम अदानी यांच्या व्यवसायातील फसवणुकीच्या आरोपांविरोधात लढा सुरू असतानाच IHC कंपनीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

IHC ही UAE मधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचे मार्केट कॅप UAE 235.98 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सकडून कोणतीही अधिकृत माहिती याबाबत आलेली नाही.

IHC कंपनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, ग्रीन एनर्जी आणि ग्रीन ट्रान्समिशन त्यांच्या उपकंपन्या अदानी ग्रीनमधील त्यांचे 1.26 टक्के आणि अदानी एनर्जी सोल्युशन्समधील 1.41 टक्के हिस्सा विकतील. सध्या दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणुकीचे मूल्य अंदाजे 3,327 कोटी रुपये आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT