After receiving the order Suzlon Energy Ltd Share have seen tremendous growth  Sakal
Share Market

ऑर्डर मिळाल्यानंतर 'या' शेअरमध्ये झाली जबरदस्त वाढ, यावर्षी आतापर्यंत 250 टक्के परतावा

Suzlon Energy Ltd Share: सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon Energy) शेअर्समध्ये दमदार तेजी दिसून येत आहे. नुकतीच कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमुळे या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिक तेजी दिसली. सुझलॉनला केपी समूहाकडून 193.2 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे.

राहुल शेळके

Suzlon Energy Ltd Share: सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon Energy) शेअर्समध्ये दमदार तेजी दिसून येत आहे. नुकतीच कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमुळे या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिक तेजी दिसली. सुझलॉनला केपी समूहाकडून 193.2 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे.

या बातमीनंतर गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदी झाली. गुजरात राज्यात अक्षय ऊर्जा योगदान वाढवण्यासाठी विंड सोलर हायब्रिड आणि एसटीयू (स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी) टॅरिफ-आधारित प्रोजेक्‍टचा हा भाग असेल.

या वर्षी आतापर्यंत या शेअरने सुमारे 250 टक्के परतावा दिला आहे. सुझलॉन एनर्जी ही पवन ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. देशांतर्गत बाजारात कंपनीचा हिस्सा 33 टक्के आहे.

सुझलॉन गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील वज्र आणि विलायतला S120 – 2.1 MW विंड टर्बाइन जनरेटरच्या (WTGs) 92 युनिट्सचा पुरवठा करेल. हे 140m हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (HLT) टॉवरसह असेल. या प्रकल्पांतर्गत सुझलॉन सप्‍लाय, सुपरव्हिजन आणि कमिशनिंगचे काम पाहणार आहे. याशिवाय, कंपनी कमिश्‍निंगनंतरही ऑपरेशन आणि मेन्‍टेनेंस सर्व्हिसेसची जबाबदारी सांभाळणार आहे.

सुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या वर्षात मल्टीबॅगर ठरले आहेत. 2023 (21 डिसेंबर 2023) मध्ये आतापर्यंतचा परतावा 245 टक्क्यांहून अधिक आहे. मागील 6 महिन्यांचा 165 टक्के आहे. बुधवारी स्टॉक लोअर सर्किटसह 35.65 वर बंद झाला. 21 डिसेंबर 2023 रोजी कंपनीचे मार्केट कॅप बीएसईवर सुमारे 50,098 कोटीवर पोहोचले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: शेतात लागलेल्या आगीत सालदाराचा संसार जळून खाक, तळवेल फाट्या जवळील घटना

SCROLL FOR NEXT