Amazon India Sakal
Share Market

Amazon India: देशात OTT युद्ध वाढणार! Amazon ने विकत घेतले MX Player, इतक्या कोटींची झाली डील?

MX Player हे जागतिक स्तरावर सर्वाधिक डाउनलोड केलेले OTT प्लॅटफॉर्म आहे.

सकाळ डिजिटल टीम

Amazon India: MX Player संदर्भात Amazon India आणि TIL (Times Internet Limited) यांच्यात बराच काळ चर्चा सुरू होती. वाटाघाटीच्या प्रदीर्घ काळानंतर, Amazon ने TIL कडून MX Player विकत घेतले आहे. पूर्वीच्या खरेदी किंमतीच्या तुलनेत खूपच कमी पैशात हा करार झाला आहे, असे सांगितले जात आहे.

Amazon आणि TIL मधील हा करार 45 ते 50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 350 ते 400 कोटींमध्ये निश्चित झाला आहे. 2018 मध्ये, TIL ने सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च करून MX Player खरेदी केले होते, अशी माहिती exchange4media वेबसाईटने दिली आहे.

Amazon आणि TIL यांच्यात MX Player संबंधित करार झाला आहे आणि कराराची रक्कम या वर्षी 30 जूनपर्यंत पूर्ण केली जाईल असाही निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकन स्थित ई-कॉमर्स कंपनी Amazon ने या कराराची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आघाडीच्या सल्लागार कंपनीशी संपर्क साधला आहे.

या डीलच्या रकमेपैकी एक तृतीयांश रक्कम एमएक्स प्लेयरच्या सीईओ किरण बेदी यांना दिली जाईल आणि उर्वरित रक्कम इतर भागधारकांना दिली जाईल. किरण बेदी पुढील एक वर्ष एमएक्स प्लेयरचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे मानले जात आहे.

Data.ai. ने जारी केलेल्या स्टेट ऑफ मोबाईल 2023 अहवालानुसार, 2022 मध्ये, MX Player ला जागतिक स्तरावर सर्वाधिक डाउनलोड केलेले OTT प्लॅटफॉर्म म्हणून स्थान देण्यात आले होते. MX Player हे भारतातही सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप आहे.

या करारामुळे ओटीटी युद्ध वाढेल:

अॅमेझॉनचे भारतात सुमारे 28 दशलक्ष ग्राहक आहेत, तर एमएक्स प्लेयर्सच्या ग्राहकांची संख्या सुमारे 78 दशलक्ष आहे. MX Player च्या करारामुळे ओटीटी युद्ध आणखी वाढू शकते. Viacom18 ने JioCinema वर IPL (इंडियन प्रीमियर लीग) मोफत स्ट्रीम करून मोठा निर्णय घेतला आहे.

दूरसंचार नेटवर्कचे अधिकाधिक ग्राहक मिळवण्यासाठी Viacom18 ने हे पाऊल उचलले आहे. एवढेच नाही तर आयपीएलचे डिजिटल अधिकार मिळवण्यासाठी Viacom18 ने सुमारे 24,000 कोटी रुपये खर्च केले आहेत.

एमएक्स प्लेअरचा इतिहास:

MX Player 18 जुलै 2011 रोजी कोरियामध्ये व्हिडिओ प्लेयर अॅप म्हणून लाँच करण्यात आले. MX Player 2019 मध्ये एक OTT प्लॅटफॉर्म म्हणून पुन्हा एकदा लाँच करण्यात आले त्याचे स्वतःचे प्रोग्रामिंग देखील होते.

जेव्हा टीआयएलने हे व्यासपीठ विकत घेतले तेव्हा हा निर्णय खूप धाडसी मानला गेला. कारण TIL चा पूर्वीचा OTT उपक्रम, BoxTV.com, 2016 मध्ये लाँच झाल्याच्या चार वर्षानंतरच बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20I : एवढा लाड! Harshit Rana वरून नेटिझन्सनी गौतम गंभीरला झोडले; फलंदाजीतही दिलंय प्रमोशन, अर्शदीप पुन्हा बळीचा बकरा...

नगराध्यक्षपदासाठी जयंत पाटलांचा महत्त्वाचा निर्णय; 'या' नेत्याला उतरवलं मैदानात, जगात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला दिलं खुलं आव्हान

Police Bharati Application Website Link : पोलिस भरतीचा अर्ज करा एका क्लिकवर..

Viral Video : ज्वेलरी शॉपमध्ये मुलीला चोरी करायला शिकवत होती आई, पण 'या' छोट्या चुकीमुळे झाला पर्दाफाश; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

November Planetary Changes: नोव्हेंबरमध्ये ४ ग्रहांची चाल बदलणार! मेष आणि वृश्चिकसह 'या' राशींच्या लोकांना होईल मोठा लाभ

SCROLL FOR NEXT