Warren Buffett  Sakal
Share Market

American Economy: अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग आणखी गडद, उद्योगपती वॉरन बफे म्हणाले, स्वप्नातही...

बँकांमध्ये आपला पैसा सुरक्षित नाही, अशी भीती लोकांच्या मनात आहे.

राहुल शेळके

Warren Buffett on US Debt: अमेरिकन अर्थव्यवस्था सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. एकीकडे 2008 नंतरच्या बँकिंग संकटामुळे मंदीचा धोका आहे, तर दुसरीकडे अमेरिकेसमोर कर्जाचे हप्ते चुकवण्याचा धोका आहे. ही परिस्थिती पाहता दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

वॉरन बफे सध्या त्यांच्या कंपनी बर्कशायर हॅथवेच्या गुंतवणूकदारांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथे होते.

यादरम्यान, त्यांनी शनिवारी अमेरिकन डिफॉल्टच्या वाढत्या भीतीबद्दल सांगितले की त्यांनी स्वप्नातही अशा परिस्थितीची कल्पना केली नव्हती.

बँकिंग क्षेत्राने ज्या प्रकारे अलीकडील संकट हाताळले आहे त्यावरही त्यांनी टीका केली आणि ते म्हणाले की जर डिफॉल्टची भीती खरी ठरली तर आर्थिक संकट आणखीन वाढेल.

बफेट यांनी बर्कशायरच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत बँकिंग संकटावर खुलेपणाने चर्चा केली. ते म्हणाले की सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक ज्या प्रकारे राजकारणी, नियामक आणि प्रेस यांनी हे प्रकरण हाताळले ते पूर्णपणे चुकीचे होते आणि बँक ठेवीदारांना अवाजवी भीती दाखवली.

अजूनही अमेरिकेवर विश्वास:

बफेट यांनी सांगितले की, अमेरिकेत भीतीचे पसरली आहे. बँकांमध्ये आपला पैसा सुरक्षित नाही, अशी भीती लोकांच्या मनात असेल, तर अशा स्थितीत आपण अर्थव्यवस्था चालवू शकत नाही.

मात्र, सर्व बदल होऊनही त्यांचा अमेरिकेवरील विश्वास कमी झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या काळातही मला अमेरिकेत जन्म घ्यायला आवडेल, असे ते म्हणाले.

बफेटची कंपनी बर्कशायरने मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा नफा 35.5 अब्ज डॉलर होता. या कालावधीत कंपनीने 4.4 अब्ज डॉलर किंमतीचे शेअर्स पुन्हा खरेदी केले.

जेव्हा बर्कशायरला असे वाटते की त्यांचे शेअर्स कमी आहेत, तेव्हा ते स्वतःचे शेअर्स विकत घेतात. दुसरीकडे, कंपनीने या तिमाहीत 13.3 अब्ज डॉलर किंमतीच्या इतर कंपन्यांचे शेअर्स विकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : अद्भूत! सौदी अरेबियात ११५० फूट उंचीवर उभारलं जातंय "sky stadium”, २०३४ च्या Fifa World Cup ची तयारी

Kolhapur Politics : असला सरपंच आम्हाला नको!, कोल्हापुरातील 'या' गावाने थेट संरपंचांविरोधात अविश्वास ठरावासाठी केलं मतदान

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

World Cup 2025: प्रतिका रावलला नेमकं काय झालं, तिच्या जागेवर कोण खेळणार? BCCI ने अखेर दिले महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

SCROLL FOR NEXT