Glenmark Pharma Sakal
Share Market

Glenmark Pharma: निरमा ग्रुपने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीचा 75 टक्के हिस्सा घेतला विकत, काय झाली डील?

Glenmark Pharma: ग्लेनमार्क फार्मा 75 टक्के हिस्सा का विकत आहे?

राहुल शेळके

Glenmark Pharma: ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीने (GPL) 21 सप्टेंबर रोजी घोषणा केली की ते ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस मधील 75% हिस्सा निरमा ग्रुपला विकणार आहे. हा करार 5,651 कोटी रुपयांना झाला आहे. हे शेअर्स 615 रुपये किंमतीला विकले जातील. 21 सप्टेंबर रोजी ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह 627.10 रुपयांवर बंद झाले.

सेबीच्या नियमांनुसार निरमा सर्व सार्वजनिक भागधारकांना ओपन ऑफर देईल. या करारानंतर ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसची मूळ कंपनी ग्लेनमार्क फार्माची कंपनीत 7.84 टक्के मालकी असेल.

ग्लेनमार्क फार्मा हा करार का करत आहे?

ग्लेनमार्क फार्मा कंपनीवर कर्ज आहे, ते कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या करारामुळे निरमाची फार्मा क्षेत्रातील पकड मजबूत होईल. हा करार कंपनी आणि ब्रँडसाठी महत्त्वाचा असणार आहे.

या कराराबद्दल ग्लेनमार्क फार्माच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, निरमा समूहासाठी हा करार फार्मा क्षेत्रातील मोठे पाऊल आहे. अनेक व्यवसायात आपण यशस्वी झालो असून यापुढेही विस्तार करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस ही ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सची उपकंपनी आहे. ग्लेनमार्क लाइफमध्ये ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचा 82% पेक्षा जास्त हिस्सा आहे.

ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस 2023 मध्ये ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सच्या उत्पन्नात सुमारे 17% वाटा होता. मार्चअखेर ग्लेनमार्क लाइफची एकूण संपत्ती 2,138 कोटी रुपये होती.

गुरुवारी, राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजवर ग्लेनमार्क लाइफचे शेअर्स 1.4% घसरणीसह 626.20 रुपयांवर बंद झाले, तर मूळ कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचा शेअर 3.4% घसरणीसह 827.70 रुपयांवर बंद झाला.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT