Hindenburg Report news esakal
Share Market

Hindenburg Report: हिंडेनबर्ग अहवालात 3 लिस्टेड कंपन्यांचा उल्लेख, शेअर बाजार रडारवर, गुंतवणूकदारांचं काय होणार?

Hindenburg Report Mentions 3 Listed Companies: Stock Market Update for Investors : हिंडनबर्गने ताज्या अहवालात आरोप केला आहे की सेबीच्या चेयरपर्सन माधवी बुच आणि त्यांच्या पतींना अडानी फंड हेराफेरी घोटाळ्यात वापरलेल्या अस्पष्ट ऑफशोर फंडमध्ये हिस्सेदारी होती.

Sandip Kapde

अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतात खळबळ निर्माण केले आहे. हिंडेनबर्गने सेबी प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हिंडनबर्ग अहवालात अनेक कंपन्यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत आणि त्यामुळे सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये त्यांच्या शेअर्समध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.

कोणत्या कंपन्यांचा उल्लेख?-

हिंडनबर्गच्या ताज्या अहवालात फाइनान्स सेक्टरशी संबंधित कंपनी IIFL, नेक्सस सेलेक्ट ट्रस्ट, आणि माइंडस्पेसचा उल्लेख आहे. IIFL चे शेअर बीएसई इंडेक्सवर 423 रुपयांना आहेत. गेल्या शुक्रवारी या शेअरमध्ये 2% ची घसरण झाली होती. एनएसई वर नेक्सस सेलेक्ट ट्रस्टचे शेअर 137 रुपयांना आहेत आणि गेल्या शुक्रवारी हे शेअर सुमारे 5% नी खाली आले होते. माइंडस्पेसचे शेअर 343 रुपयांना आहेत आणि ते शुक्रवारी थोड्या वाढीसह बंद झाले होते.

हिंडनबर्गच्या आरोपांमुळे गुंतवणूकदारांवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे आगे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हिंडनबर्गच्या आरोपांनंतर अडानी समूहाचे शेअर्स बऱ्याच प्रमाणात क्रॅश झाले होते. त्यामुळे आता देखील शेकर मार्केट रडारवर आहे का?, अशी चर्चा रंगली आहे.

यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण हे आरोप शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण करू शकतात. शेअरच्या किमतींमध्ये मोठी चढउतार होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.

हिंडनबर्गचा नेमका आरोप काय?

हिंडेनबर्गने दावा केला की माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी होती. हिंडेनबर्गने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, सेबीने अदानी समूहाच्या संशयास्पद भागधारक कंपन्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. या कंपन्या इंडिया इन्फोलाइनच्या EM रिसर्जंट फंड आणि इंडिया फोकस फंडाद्वारे चालवल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT