Investment Tips in marathi Which 10 shares perform today Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात खरेदी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: शुक्रवारी अखेर बाजारातील घसरणीचा ट्रेंड थांबला आणि सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद झाले. निफ्टीमध्ये सुमारे 90 अंकांची वाढ दिसून आली. सेन्सेक्स 360 अंकांनी वाढून 72664 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): शुक्रवारी अखेर बाजारातील घसरणीचा ट्रेंड थांबला आणि सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद झाले. निफ्टीमध्ये सुमारे 90 अंकांची वाढ दिसून आली. सेन्सेक्स 360 अंकांनी वाढून 72664 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 98 अंकांनी वाढून 22055 वर बंद झाला. बँक निफ्टी 67 अंकांनी घसरून 47,421 वर बंद झाला. मिडकॅप 423 अंकांनी वाढून 49,532 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शुक्रवारी भारतीय बाजार मोठ्या प्रमाणावर सकारात्मक दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. मात्र, बाजारातील महागडे मूल्यमापन आणि कमी मतदानाची टक्केवारी पाहता गुंतवणूकदारांच्या मनात निवडणुकीची अस्वस्थता आहे, त्यामुळे विक्री दिसून आली.

दर कपातीला विलंब, महागाईची चिंता, कॉर्पोरेट निकालांमधील घसरण आणि महागडे मूल्यांकन यामुळे एफआयआय भारतीय बाजारात विक्री करत आहेत.

परदेशी बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांच्या आधारे शुक्रवारी बाजारात चांगले शॉर्ट कव्हरिंग दिसून आले, त्यामुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे यांनी सांगितले. पण, तीव्र इंट्राडे चढउतार पाहता, बाजाराचा एकूण कल अजूनही सावध राहण्याचा आहे.

पुढील काही आठवड्यांत गुंतवणूकदार त्यांच्या इक्विटी एक्सपोजरवर लक्ष ठेवून राहतील कारण निवडणुकीच्या आघाडीवरून येणाऱ्या कोणत्याही नकारात्मक बातम्यांमुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • एनटीपीसी (NTPC)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Reaction On Sharad Pawar : शरद पवार यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे काय म्हणाले, पक्ष एकत्रीकरणावरही प्रतिक्रिया...

Gold Rate Today : सोनं 19 हजार तर चांदी 98 हजारांनी स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून रामकुंडाची पाहणी

Nylon Manja : नायलॉन मांजामुळे नागपूर शहरात ३६ जण जखमी

Pakistan Cricket : पाकिस्तानचा गोंधळ! T20 World Cup बद्दल केलेला मेसेज डिलिट... आता यांचा काय नवीन ड्रामा? चाहते संतापले

SCROLL FOR NEXT