Investment Tips in marathi Which 10 shares perform today TATACONSUM LTIM MPHASIS 17 May 2024  Sakal
Share Market

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Share Market Investment Tips: विकली एक्स्पायरीच्या दिवशी शेवटच्या तासात निफ्टीत मोठी खरेदी दिसून आली. त्यामुळेच बाजारात गुरुवारी खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी झाली. बीएसईचे जवळपास सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत दिसून आले. मिडकॅप इंडेक्समध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): विकली एक्स्पायरीच्या दिवशी शेवटच्या तासात निफ्टीत मोठी खरेदी दिसून आली. त्यामुळेच बाजारात गुरुवारी खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी झाली. बीएसईचे जवळपास सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत दिसून आले. मिडकॅप इंडेक्समध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ झाली.

मिडकॅप इंडेक्स 450 हून अधिक अंकांनी वाढला. आयटी आणि रियल्टी शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली. कंझ्युमर गुड्स इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक वाढला.

व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 677 अंकांनी वाढून 73,664 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 203 अंकांनी वाढून 22,404 वर बंद झाला. तर बँक निफ्टी 290 अंकांनी वाढून 47,977 वर बंद झाला. तर मिडकॅप 446 अंकांनी वाढून 51,153 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टीमध्ये जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. इंट्राडेत या इंडेक्समध्ये 1000 अंकांची उसळी दिसून आली. आता बँक निफ्टीला 48200 वर रझिस्टंस आहे जो त्याच्या 20-डे मूव्हिंग एव्हरेजच्या (20DMA) जवळ आहे.

हा रझिस्टंस तुटल्यास, बँक निफ्टीमध्ये 49000 अंकांच्या दिशेने शॉर्ट कव्हरिंग होऊ शकते. तर खाली बँक निफ्टीला 47600-47500 वर सपोर्ट आहे. जोपर्यंत हा सपोर्ट आहे, तोपर्यंत वाढ होत राहील.

शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजारात मजबूत रिकव्हरी होती, त्यामुळे बाजार तेजीत बंद झाल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले. ज्या वेळी एफआयआय देशांतर्गत शेअर्समधून त्यांचे पैसे काढत आहेत, त्या वेळी एमएससीआय इंडेक्समध्ये नवीन शेअर्स जोडले जात असल्याची समोर आले, यामुळे नवीन एफपीआय गुंतवणूक येण्याची आशा आहे.

ज्यामुळे बाजारात काहीसा आनंद दिसून आला. निवडणुकीच्या आघाडीवर, सत्ताधारी भाजप सरकार बहुमत मिळवून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा बाजारात आहे. याचा अर्थ भविष्यातही धोरणात्मक सुधारणा होत राहतील. यामुळे बाजारालाही सपोर्ट मिळत आहे.

अमेरिकन बाजारातील विक्रमी उच्चांकानंतर प्रॉफिट बुकींगही पाहायला मिळाले. डाऊ जोन्सने प्रथमच इंट्राडेमध्ये 40 हजारांचा टप्पा पार केला. त्याच वेळी, तो 40 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. S&P 500 आणि Nasdaq वर देखील थोडीशी घसरण दिसून आली.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • एलटी माइंडट्री (LTIM)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT