Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात पुन्हा घसरण होणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय इक्विटी बेंचमार्क इंडेक्स अस्थिर व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 354.21 अंकांनी अर्थात 0.49 टक्क्यांनी घसरून 71,731.42 वर आणि निफ्टी 82.10 अंकांनी म्हणजेच 0.38 टक्क्यांनी घसरून 21,771.70 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय इक्विटी बेंचमार्क इंडेक्स अस्थिर व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 354.21 अंकांनी अर्थात 0.49 टक्क्यांनी घसरून 71,731.42 वर आणि निफ्टी 82.10 अंकांनी म्हणजेच 0.38 टक्क्यांनी घसरून 21,771.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सोमवारी निफ्टी वाढीसह उघडला, मात्र दिवसभरात विक्रीचा दबाव दिसून आल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. व्यवहाराच्या शेवटी तो 82 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. डेली चार्टवर निफ्टीला 22000 वर विक्रीचा दबाव दिसून आला.

आवर्ली इंडिकेटरमध्ये नकारात्मक वातावरण दिसत आहे जे वरच्या स्तरावरून दबाव निर्माण करण्याचे संकेत आहेत. एकूणच, निफ्टी 22000 - 21200 च्या रेंजमधून बाहेर येईपर्यंत रेंज बाउंड ट्रेडिंग सुरू ठेवण्याची शक्यता आहे.

डेली आणि आवर्ली मोमेंटम सेटअप वेगवेगळे संकेत देत आहेत जे पुन्हा साइडवेज एक्शनचे संकेत आहेत. अशा स्थितीत बाजारात कंसोलीडेशन सुरू राहण्याची शक्यता आहे.

कंसोलीडेशनच्या कालावधीत सेक्टर रोटेशन सुरू राहणे अपेक्षित आहे. निफ्टीसाठी 21640 - 21600 वर सपोर्ट आहे आणि 21950 - 22000 च्या झोनमध्ये रझिस्टंस आहे.

शेवटच्या ट्रेडिंग सत्रापासून बँक निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. एकंदरीत, त्याचा ट्रेंडही साइडवेज आहे आणि त्याची कंसोलीडेशन रेंज 45000 - 47000 असण्याची अपेक्षा आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • ग्रासिम (GRASIM)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Latest Marathi News Update LIVE: नाशिकच्या मोरे मळ्यात दहशत संपली! अखेर बिबट्या जेरबंद

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

SCROLL FOR NEXT