Reliance mukesh ambani Sakal
Share Market

Jio Financial Share: 23,700 कोटींचे नुकसान, मुकेश अंबानींच्या नवीन कंपनीची सलग तिसऱ्या दिवशी घसरण

Jio Financial Services: NSE वर कंपनीचा शेअर 224.65 रुपयांवर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Jio Financial Services: संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर्स बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर दिसून आले.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीचा शेअर 224.65 रुपयांवर व्यवहार करत आहे. विशेष बाब म्हणजे जिओ फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे कंपनीचे बाजार मूल्य 23,700 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

मंगळवारी, एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेडने सलग दोन दिवस स्टॉक लोअर सर्किटवर आल्यामुळे सेन्सेक्स आणि बीएसईसह सर्व प्रमुख एक्सचेंजेसमधून स्टॉक डिलिस्ट करण्याचा निर्णय तीन दिवसांनी पुढे ढकलला. जिओ फायनान्शियल सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी 50 सह BSE आणि NSE च्या प्रमुख निर्देशांकांचा भाग आहे.

जुलैमध्ये डी-मर्जर नंतर जिओ फायनान्शियल रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळे झाले होते. त्यावेळी शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली होती. Jio Financial चे मार्केट कॅप 1.60 लाख कोटी रुपये आहे.

लिस्टिंगनंतर, अशा गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला आहे, ज्यांच्याकडे रेकॉर्ड तारखेपर्यंत म्हणजेच 20 जुलैपर्यंत RIL चे शेअर्स होते. विलिनीकरण प्रक्रियेअंतर्गत, गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले आहेत.

RIL च्या वित्तीय सेवा कंपनीकडे ब्रोकिंग, AMC, NBFC, विमा आणि म्युच्युअल फंड यांचा परवाना आहे. जिओ फायनान्शिअलचे 6 कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे.

या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज (RIIHL), रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स, रिलायन्स रिटेल फायनान्स, जिओ पेमेंट्स बँक, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लि. यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT